You are currently viewing उद्यान पंडित, कृषिभूषण, शेतीनिष्ठ श्री. संतोष गाडगीळ यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश

उद्यान पंडित, कृषिभूषण, शेतीनिष्ठ श्री. संतोष गाडगीळ यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश

उद्यान पंडित, कृषिभूषण, शेतीनिष्ठ श्री. संतोष गाडगीळ यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश

सावंतवाडी

महाराष्ट्र शासनाच्या उद्यान पंडित , कृषिभूषण या पुरस्कारांनी सन्मानित शेतीनिष्ठ व्यक्तिमत्व म्हणून नावलौकिक असलेले वेतोरे येथील श्री. संतोष गाडगीळ यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. आमदार श्री. बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते सन्मान करून श्री. संतोष गाडगीळ यांचे स्वागत करण्यात आले.

“आदरणीय शारदचंद पवार साहेबांनी शेतकऱ्यांना सन्मान मिळवून दिला, 100% फलोत्पादन योजना राबविल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक शेतकरी स्वतः च्या पायावर उभे राहू शकले. सध्याचे सरकार मात्र शेतकऱ्यांना संपवण्याच्या प्रयत्नात आहे. आम्हाला कोणत्याही पदाची अपेक्षा नसून शेतकऱ्यांना पुन्हा सन्मान मिळावा, त्यांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळावा आणि ते फक्त शरद पवार साहेब करू शकतात म्हणून मी आदरणीय पवार साहेबांसोबत उभा आहे.” असे मनोगत यावेळी श्री. संतोष गाडगीळ यांनी व्यक्त केले.

श्री संतोष गाडगीळ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात ग्रामीण भागात भरघोस काम घडेल अशा शुभेच्छा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कोकण विभाग अध्यक्ष सौ. अर्चनाताई घारे यांनी यावेळी व्यक्त केल्या.

श्री. संतोष गाडगीळ याना मानणारा मोठा वर्ग वेंगुर्ले तालुका व सावंतवाडी परिसरात असून त्यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मोठी ताकत मिळणार आहे.

*संवाद मीडिया*

🦻🦻🦻🦻🦻🦻🦻🦻

🦻 *_बहिरेपणावर कायमस्वरूपी इलाज! कानाची कोणतीही समस्या आता होईल गायब..केवळ ६३०० रुपयांत_*

🦻 *_कानाचे ऑपरेशन अयशस्वी झाले आहे? कानातून आवाज येतो? मशीन लावून पण ऐकायला येत नाही? कानाला होल आहे? कानाचा पडदा फाटलाय? कानातून पाणी, पस बाहेर येतोय? कान सातत्याने ठणकतोय? मोठ्याने बोलले तरी ऐकू येत नाही…_*

🦻 *_या सर्व समस्यांवर रामबाण उपाय, २५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या भारत सरकार मान्यताप्राप्त ऋषिकेश आयुर्वेदाचे औषध मागवा..९० दिवसांच्या औषधीसोबत ९० दिवसांचे औषध फ्री..पहिल्या १० दिवसांत ५० टक्के फरक.._*

👉 *_घरपोच औषध मागवण्यासाठी 📲9607305863 या क्रमांकावर नाव गाव पत्ता पिनकोडसह व मोबाईल नंबर व्हॉटस् अप करा.._*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/112426/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा