फोंडाघाट मधील एक संवेदनशील डाॅक्टर….
आजोबा, आई वडील सर्व वैद्यकीय क्षेत्रात, त्यांनीही गावात चांगली सेवा दिली.
दवाखान्यात प्रवेश केला की, आजोबा जे स्वतः काढे तयार करायचे ती चिनी मातीची मोठी कुपी दिसते.अजुनही डाॅ.शैलेंद्रने जोपासली आहे.त्यांची पत्नीही डाॅ.श्रृती यांचाही कणकवली येथे दवाखाना आहे.मुलगाही शिक्षण घेत आहे.त्यांचे काकाही डाॅक्टर पुण्यातील टाटा कंपनीच्या पॅनेलवरचे महान हस्ती.त्यांचाही स्वतःचा दवाखाना पुण्यात आहे. सर्वसामान्य पेशंटचा केव्हाही फोन आला की सर्वांना प्रथमोपचार म्हणुन कार्यतत्पर डाॅक्टर… त्यामुळे आमच्याही तीन पिढ्याचे हे डाॅक्टर असल्याचे सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी आवर्जून सांगतात.
फोंडाघाट मधील अशी २०० तरी कुटुंब मिळतील.सकाळी ८/३० ते रात्री पेशंट संपेपर्यत ११ वाजलेतरी रुग्ण सेवा हिच ईश्वर सेवा मानणारे एक डाॅक्टर….त्यांच्याशी संवाद साधताना एक गोष्ट प्रामुख्याने जाणवते कि, सकाळीच नाष्टा करुन येतो.कारण दुपारी जेवायला मिळेल याची खंत असते.पेशंट आहेत म्हणुन त्यांना ओढुन नेले असे कधीच दिसत नाही.आणि कोणताही बडेजांव नाही.वास्तव्य कणकवलीत असलं तरी माझं गांव फोंडाघाट आहे.येथील भाजीवाले दुध खरेदी स्टेशनरी औषध खरेदी फोंडाघाट मधुन या ठिकाणच्या लोंकांना आर्थिक फायदा आपणामुळे झाला पाहीजे हि रास्त भावना असल्याचे ते सांगतात.
मी चालवीत असलेला एम.बी.सी.लोकआवाज तर्फे त्याचा सत्कार करणेत येईल.गेल्या वर्षी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी श्री.जंगम आणि असिस्टंट डाॅ.टिकले मॅडम यांचा सत्कार केला होता.यावर्षी दसऱ्या दिवशी माझे वडील स्व.बाबासाहेब नाडकर्णी यांच्या पुण्यतिथी दिवशी डाॅ.शैलेंद्र आपटे यांचा सत्कार आमच्या कुटुंब आणि लोकआवाज तर्फे करण्यात येईल, असे नाडकर्णी यांनी स्पष्ट केले.
कोणत्याही राजकारण विरहीत व्यवसाय हा त्यांचा गुण आज फोंडाघाट मध्ये तो करीत असलेली सेवा त्याच्या भावी आयुष्यात कामी येवो, हिच श्री.गांगोमाऊली चरणी प्रार्थना!