You are currently viewing रविकिरण तोरसकर यांची भाजपा मच्छीमार सेल सिंधुदुर्ग जिल्हा संयोजक पदी निवड

रविकिरण तोरसकर यांची भाजपा मच्छीमार सेल सिंधुदुर्ग जिल्हा संयोजक पदी निवड

मालवण :

 

भाजपा मच्छीमार सेल सिंधुदुर्ग जिल्हा संयोजक पदी रविकिरण तोरसकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी ही नियुक्ती जाहीर केली. सिंधुदुर्गातील तीन सागरी तालुके, त्याचबरोबर जिल्ह्यातील खाडी व नदी क्षेत्रातील मच्छीमार आणि मत्स्यव्यवसायीक यांच्यासाठी भाजपा मच्छीमार सेल कार्यरत आहे. मत्स्य व्यवसायाला परप्रांतीय अनधिकृत मासेमारी, डिझेल कोटा, एनसीडीसी थकित कर्जे, सुसज्ज बंदरे नसणे, सरकारी योजना मधील त्रुटी, अपुऱ्या नागरी सोयी सुविधा अशा अनेक विविध समस्या भेडसावत आहेत. भाजपा मच्छीमार सेलच्या माध्यमातून या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच जिल्ह्यात नव्याने उभारी घेणाऱ्या मत्स्यपालन क्षेत्राला उभारी देण्यासाठी विशेष प्रयत्न स्वतः मत्स्य शेतकरी असलेले पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करणार आहे.

मत्स्य व्यवसायवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र अंमलबजावणी कक्ष स्थापन करणे आणि पंतप्रधान मत्स्य संपदा योजना अंतर्गत जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ मिळवुन देणे आणि मच्छीमार महिला सक्षमीकरण ही प्रमुख उदीष्ट डोळ्यासमोर ठेऊन कार्यरत राहणार आहे. त्याचबरोबर मच्छीमार पट्ट्यामध्ये भाजपा संघटना वाढीसाठी विशेष प्रयत्न करणार आहे असे तोरसकर यांनी सांगितले. भाजपा मच्छीमार सेल सिंधुदुर्ग जिल्हा संयोजक पदी नियुक्ती बद्दल जिल्हाध्यक्ष, पालकमंत्रीयांसह केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे, माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली, भाजपा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांचे त्यांनी आभार मानले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा