शासकीय अनुदानाचे वितरण
सिंधुदुर्गनगरी
शासन जनतेच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवित असते. ह्या योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचे काम प्रशासन करते. सिंधुदूर्ग जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन येाजना राबवून लाभार्थ्यांना लाभ दिला जातो. या दोन्ही योजनांसाठी राज्य शासनाकडून निधी प्राप्त झाला असून सदरचा निधी जिल्हा प्रशासनाकडून तहसिलदार कार्यालयाकडे वर्ग करण्यात आला आहे. तहसिलदार कार्यालयाकडून हा निधी लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
संजय गांधी निराधार योजना (सर्वसाधारण) अंतर्गत लाभार्थ्यांना आजपर्यंत 4 कोटी 3 लाख 58 हजार रुपये, संजय गांधी निराधार योजना (अनुसूचित जाती) अंतर्गत 50 लाख 10 हजार रुपये तर संजय गांधी निराधार योजना (अनुसूचित जमाती) अंतर्गत 40 हजार 300 रुपयांचे अनुदान वितरीत करण्यात आलेले आहे.
श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन येाजना (सर्वसाधारण) अंतर्गत 1 कोटी 55 लाख 34 हजार 200 रुपये, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन येाजना (अनुसूचित जाती) अंतर्गत 28 लाख 88 हजार 700 रुपये तर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन येाजना (अनुसूचित जमाती) अंतर्गत 77 हजार 800 रुपये एवढे अनुदान वाटप करण्यात आले असून योजनेनुसार अनुदान प्राप्त होताच पुढील कार्यवाही करण्यात येत असल्याचे प्रशासनाच्यावतीने प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.
*संवाद मीडिया*
*# पहिल्यांदाच प्रिमियम हॅचबॅक श्रेणी मध्ये.*
*# आता होणार संपुर्ण बुटस्पेस चा वापर.*
होय.. खरं आहे..!!
𝗢𝗠𝗚! 𝗶𝘁’𝘀 𝗖𝗡𝗚! 🚗
*आता टाटा अल्ट्रोज़ सी.एन.जी मध्ये*
☘️आजच बुक करा आणि दसऱ्या दिवशी डिलीवरी घ्या..☘️
डेमो , टेस्ट ड्राइव , ऐक्सचेंज आणि फ़ायनेंस करीता आजच भेट दया अथवा कॅाल करा..
– 𝐒. 𝐏. 𝐀𝐔𝐓𝐎𝐇𝐔𝐁,
Ratnagiri | Chiplun | Kankavali
*7377-959595*
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/112315/
https://sanwadmedia.com/111578/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*