You are currently viewing वीज ग्राहक संघटना सावंतवाडी कार्यकारिणीची तातडीची बैठक रविवारी

वीज ग्राहक संघटना सावंतवाडी कार्यकारिणीची तातडीची बैठक रविवारी

सावंतवाडी :

 

वीज ग्राहक संघटना सावंतवाडी तालुका कार्यकारणीची बैठक रविवार दिनांक 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.00 वाजता सावंतवाडी नगरपालिकेच्या पहिल्या मजल्यावरील पत्रकार कक्षाच्या शेजारील हॉलमध्ये आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत महावितरणच्या भोंगळ कारभारावर नियंत्रण ठेवण्याविषयी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. या बैठकीला सर्व तालुका कार्यकारिणी पदाधिकारी व सदस्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन वीज ग्राहक संघटना सावंतवाडी तालुका अध्यक्ष संजय लाड यांनी केले आहे.

महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे तालुक्यातील वीज ग्राहकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गणेशोत्सव काळात देखील सावंतवाडी उपकार्यकारी अभियंता यांना निवेदन देऊनही संपूर्ण गणेशोत्सवात विजेची समस्या गंभीर बनली होती. सावंतवाडी शहरासहित अनेक गावांमध्ये गणेशोत्सव कालावधीत वीज गायब होत होती. त्यामुळे महावितरणच्या कारभाराविरुद्ध अनेकांमध्ये नाराजी दिसून येत आहे. वीज ग्राहक संघटनेच्या बांधा येथील बैठकीमध्ये बांदा सरपंच श्रीमती प्रियंका नाईक उपसरपंच जावेद खतीब यांनी महावितरणच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. बांदा विभागांमध्ये विजेच्या अनेक समस्या असून त्यावर वीज वितरणचे अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये येत्या आठवड्यात 19/20 सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा बैठक घेण्याचे ठरले असून त्याचे नियोजन करावयाचे आहे. सावंतवाडी शहरात देखील गेल्या काही दिवसांपासून सातत्याने विजेचा लपंडाव सुरू असून सायंकाळी चार चार तास वीज गायब होत असल्याने व्यापारी वर्गाचे नुकसान होत आहे. त्या अनुषंगाने देखील उद्याच्या तातडीच्या बैठकीत निर्णय घ्यायचा आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांची चाललेली मनमानी व वीज ग्राहकांच्या समस्या वीज ग्राहकांच्या बैठकीत समक्ष बसून सोडविण्यासाठी वीज वितरण अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यासाठी, वीज ग्राहकांच्या पाठीशी सक्षमपणे उभे राहण्याबाबत योग्य ते निर्णय घेण्यासाठी वीज ग्राहक संघटनेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन वीज ग्राहक संघटना सावंतवाडी तालुका अध्यक्ष संजय लाड यांनी केले आहे.

वीज ग्राहक संघटना सावंतवाडी तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून ती खालील प्रमाणे आहे.

अध्यक्ष श्री.संजय लाड (माडखोल), उपाध्यक्ष आनंद नेवगी (सावंतवाडी), सचिव संजय नाईक (साटेली), सदस्य:- जगदीश मांजरेकर (व्यापारी संघ तालुका अध्यक्ष), बाळ बोर्डेकर (जिल्हा समन्वयक), दीपक पटेकर (जिल्हा उपाध्यक्ष) सावंतवाडी, पुंडलिक दळवी (व्यापारी संघ) राजेंद्र(राजू) सावंत (सावंतवाडी), समीर शिंदे (देवसू), अनिकेत माडगूत (उपसरपंच सावरवाड), संतोष तावडे (ओटवणे), समीर माधव (सरमळे), सिद्धेश तेंडुलकर (मळगाव), असलम खतीब (बांदा), सुनील सावंत कलंबिस्त निलेश परब (आरोस), नंदू परब (आरोस), मोतीलाल कामत (दांडेली), रामचंद्र राहुल (तळवडा), शिवाजी परब (सरपंच आंबेगाव), सुभाष सावंत (कोनशी), संजय कानसे (माजगाव), कृष्णा गवस (कोनशी).

प्रतिक्रिया व्यक्त करा