You are currently viewing कसाल केळुसकरवाडीत घरात घुसत वृध्द महिलेच्या गळ्यातील माळ चोरली

कसाल केळुसकरवाडीत घरात घुसत वृध्द महिलेच्या गळ्यातील माळ चोरली

कसाल केळुसकरवाडीत घरात घुसत वृध्द महिलेच्या गळ्यातील माळ चोरली

धाडसी चोरीने पोलीस यंत्रणेत खळबळ:गुरुवारी सकाळी सहा वाजताची घटना

कुडाळ

कुडाळ तालुक्यातील कसाल केळुसकरवाडी येथील जानकी रामचंद्र पवार या ८५ वर्षीय वृध्द महिलेच्या घरात घुसत अनोळखी व्यक्तीने ती बाथरूम मधून घरात येत असताना पाठीमागून येऊन गळ्याला पकडून सोन्याची पावणे दोन तोळ्याची जोंधळी माळ जबरीने खेचून घेवून पोबारा केला आहे. याबाबत सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ ते ६.३० या वेळेत हा गुन्हा घडला आहे.
याबाबत स्वतः जानकी रामचंद्र पवार, वय 85 वर्षे, रा. कसाल केळूसकरवाडी यांनी सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

गळ्यातील जोंधळी माळ जबरीने चोरून नेणारी अनोळखी व्यक्ती असून त्याने डोक्यापासून ते पायापर्यंत काळसर रंगाचे कपडे परिधान केलेले होते. तसेच तो अंगाने मजबूत व उंच होता, असे जानकी पवार यांनी आपल्या फिर्यादीत नमूद केले आहे. वृध्द जानकी या 12 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी ६ ते ६.३० वाजण्याच्या सुमारास कसाल केळुसकरवाडी येथील राहत्या घरातील सकाळी उठून बाथरूम मध्ये चेहऱ्यावर पाणी मारून मागील पडवीतून घरातील मागील दरवाजाने परत येत असताना एक अनोळखी व्यक्ती पाठीमागून येऊन गळ्याला पकडून जोंधळी माळ जबरीने खेचून पायी पळून गेला.

याबाबत सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७.३२ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या करीत एक पावणे दोन तोळ्याची सोन्याची जोंधळीमाळ  चोरीस गेली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर सावंतवाडी उपविभागीय अधिकारी स्थानिक गुन्हा अन्वेषण पोलीस निरीक्षक संदीप भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र घाग यांच्या पथकासह सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष कोल्हटकर, उपनिरीक्षक राजेंद्र दळवी यांनी भेट दिली आहे. तसेच श्वान पथकाने सुद्धा भेट दिली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष कोल्हटकर हे करीत आहेत.

*संवाद मीडिया*

*समर्थ विग कॅन्सेप्टस्*

*टक्कल पडले आहे का.?काही काळजी करू नका*

*केस गळतीमुळे पडलेल्या टक्कलेपणाला तंत्रशुद्ध पद्धतीने हेअर पॅच व विग फिक्स केले जातात..तसेच एलोपेशिया व केमोथेरिपी मुळे पडलेल्या टक्कलवर हेअर विग बसवले जातात..*

*9999/- पासून सुरुवात*👍🏼🙂

◆ *Hair Bonding*
◆ *Hair Clipping*
◆ *Hair Tapping*

*फक्त आणि फक्त एक तास*😱😃

★ *कोणतीही शस्त्रक्रिया नाही*
◆ *कोणतेही औषध नाही*
★ *कोणताही दुष्परिणाम नाही*
★ *जेवढे केस गेलेत तेवढाच पॅच*
★ *रिम्हुवेबल*
★ *वॉशेबल*
★ *पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र केबिन*
★ *मुंबई टीम वर्क*

*संपर्क:- *समर्थ विग 😱कॅन्सेप्ट,आरोग्य मंदिर,रत्नागिरी*

*मोबा.नं..9890334049 / 9284753743*
*ठाणे:- 7021132827*
*इस्लामपूर:-9594373681*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/110772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा