– अधीक्षक डाकघर के.एन.बावनकुळे
सिंधुदुर्गनगरी
पोस्टाच्या कार्यपध्दतीविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्याच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल, अशा तक्रारींची दखल घेण्यासाठी दिनांक 9 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 11.00 वाजता अधीक्षक डाकघर, सिंधुदुर्ग विभाग सिंधुदुर्गनगरी येथे डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अधीक्षक डाकघर, के.एन बावनकुळे यांनी दिली आहे.
विशेषत: टपाल,स्पीडपोस्ट काऊंटर सेवा, डाक वस्तू, पार्सल, बचत बँक व मनिऑर्डर याबाबतच्या तक्रारी या डाक अदालीतमध्ये विचारात घेतल्या जातील. तक्रारीचा उल्लेख सर्व तपशिलासह केलेला असावा. उदा. तारीख व ज्या अधिकाऱ्यास पाठविली असेल त्याचे नाव व हुद्दा इत्यादी. संबंधितांनी डाक सेवेबाबतची आपली तक्रार श्री. के.एन. बावनकुळे, अधीक्षक डाकघर, सिंधुदुर्ग विभाग, सिंधुदुर्गनगरी 416812 यांच्या नावे दिनांक 5 डिसेंबर 2020 पर्यंत अथवा त्यापुर्वी पोाहेचेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या तक्रारींची दखल घेतली जाणार नाही असे, के.एन. बावनकुळे, अधीक्षक डाकघर, सिंधुदुर्ग विभाग, सिंधुदुर्गनगरी यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.