मसुरे :
मसुरे सय्यद जुवा येथील रहिवासी आणि एलआयसी मालवण येथील प्रसिद्ध विमा सल्लागार सामाजिक कार्यकर्ते संगीता गणपत नार्वेकर वय 47 यांचे बुधवारी रात्री दहाच्या सुमारास निधन झाले. गुरुवारी दुपारी साडेअकरा वाजता बांदिवडे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. येथील व्यापाऱ्यांनी रिक्षा व्यवसायिकांनी व्यवसाय बंद ठेवून संगीता यांना श्रद्धांजली वाहिली. संगीता यांच्या निधनाने मसुरे बांदिवडे गावावरती शोककळा पसरली आहे.
संगीता नार्वेकर या मालवण तालुक्यामध्ये एलआयसी विमा सल्लागार म्हणून सर्वांना परिचित होत्या. एलआयसी कंपनीच्या वतीने संगीता यांना अनेक पुरस्कार मिळाले होते. नुकताच त्यांना सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कामाबद्दल मानवता विकास परिषदचा राज्यस्तरीय पुरस्कार सुद्धा मिळाला होता. गावातील अनेक संस्थांमध्ये त्या कार्यरत होत्या.
मसुरे, बांदिवडे गावातील सामाजिक क्षेत्रामध्ये संगीता यांचे योगदान फार मोठे होते. तसेच कला क्रीडा शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा वेळोवेळी सर्वांना त्यांनी मदत केली होती. आर पी बागवे हायस्कूलच्या सांस्कृतिक कमिटीची त्या सदस्या होत्या. गावातील अनेक गरीब होतकरू विद्यार्थ्यांना त्यांनी वेळोवेळी शैक्षणिक मदत केली. गावातील धार्मिक कार्यक्रमात त्यांचा सहभाग मोठा असायचा. कट्टा येथील थोर संत राणे महाराज यांची त्या निःसीम सेविका होत्या. गरीब गरजू कुटुंबांना एलआयसीच्या माध्यमातून त्यांनी अनेक वेळा मोठ्या मदती मिळवून दिल्या होत्या. मालवण तालुक्यामध्ये सर्वांशी त्यांचे चांगले संबंध होते. सर्वांशी त्या मिळून मिसळून वागत. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, भावजय असा परिवार असून मालवण येथील प्रसिद्ध पारिजात हॉटेलचे मालक शाम आणि सुंदर युवा सामाजिक कार्यकर्ते संजय आणि शंकर तसेच त्या काळातील प्रसिद्ध युवक काँग्रेस नेते कै.राजू नार्वेकर यांची त्या बहिण होतं.