You are currently viewing सुदृढ जीवनाचे तत्व..

सुदृढ जीवनाचे तत्व..

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या कवयित्री डॉ.गौरी एदलाबादकर लिखित (१० ॲाक्टोबर) जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त काव्यरचना*

 

सुदृढ जीवनाचे तत्व..

 

सुखं सारी हात जोडून

उभी आहेत दारी

तरीही का मजला

उदास वाटते भारी ?

 

मन माझे काही

कशात रमेना,

रूखरूख कसली?

मुळीच करमेना !

 

किती वर्ष केले

धावपळीत काम,

कुतरओढ करीत

गाळला किती घाम!

 

मिळवला जरी

बऱ्यापैकी दाम,

तरी जगण्यात

वाटेनाच राम !

 

अचानक उघडला

आज मनाचा गाभारा,

अन् गवसला मज

आत्मशांतीचा तेजपुंज तारा!

 

भौतिक सुखातच

हरवलो होतो,

जगण्याचा अर्थच

गमावलो होतो!

 

पैशात विकत घेता

येत नाही आनंद,

समाधान, शांतीशी

जुळायला हवेत बंध!

 

शांत स्थिर बसून

करता जरा ध्यान,

गळून पडला की

सारा वृथा अभिमान!

 

शारिरीक स्वास्थ्यासवे

मनस्वास्थ्याचेही महत्व,

त्याच्यातच सामावले आहे

सुदृढ जीवनाचे तत्व !

 

डॅा गौरी एदलाबादकर

पुणे

प्रतिक्रिया व्यक्त करा