You are currently viewing सावंतवाडी टर्मिनसचे ‘प्रा. मधू दंडवते टर्मिनस ‘ नामकरण करा

सावंतवाडी टर्मिनसचे ‘प्रा. मधू दंडवते टर्मिनस ‘ नामकरण करा

सावंतवाडी टर्मिनसचे ‘प्रा. मधू दंडवते टर्मिनस ‘ नामकरण करा

प्रा. मधू दंडवते स्मारक समितीची मागणी : प्रशासनाला निवेदन सादर

कोकण रेल्वेच्या सर्व स्थानकांत दंडवतेंचे तैलचित्र लावा

२६ जानेवारीपर्यंत अंमलबजावणी न झाल्यास लाक्षणिक आंदोलन

सावंतवाडी

कोंकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधू दंडवते यांची स्मृती जपण्यासाठी कोकण रेल्वेच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक रेल्वे स्थानकात माजी खासदार तथा माजी केंद्रीय रेल्वे व अर्थमंत्री प्रा. मधू दंडवते यांचे तैलचित्र ठळक ठिकाणी लावण्यात यावे तसेच सावंतवाडी टर्मिनसचे ‘प्रा. मधू दंडवते टर्मिनस ‘ असे नामकरण करावे, अशी मागणी प्रा. मधू दंडवते स्मारक समितीच्या माध्यमातून करण्यात आली. पालघर ते सावंतवाडी स्थानकावर कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधू दंडवते स्मारक समितीच्यावतीने कोकण रेल्वे कॉर्पोरेशनला निवेदन देत ही मागणी केली.‌

सावंतवाडीत स्मारक समितीचे निमंत्रक ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, भाई देऊलकर, मिहीर मठकर, सागर तळवडेकर यांनी सावंतवाडी स्थानकात भेट देत याबाबतचे निवेदन सादर केले. यावेळी रेल्वे स्थानक रिक्षा युनियन अध्यक्ष संदीप बाईत , उपाध्यक्ष शाम सांगेलकर, अजित सातार्डेकर, प्रदीप सोनवणे,दिलीप तानावडे,सचिन तळकटकर,सुरेंद्र गावडे,सचिन गावकर,अजित वैज,एकनाथ नाटेकर,अशोक गावडे,महेश खडपकर,भास्कर तांडेल आदी उपस्थित होते. या निवेदनावर सुमारे ३२० मान्यवर प्रवासी नागरिकांनी सह्या केल्या आहेत.

कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधू दंडवते यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरु आहे. प्राध्यापक दंडवते यांचे कोकण रेल्वे निर्माण कार्यात मोठे ऋण आहेत. दऱ्याखोऱ्यातून कोंकण रेल्वेचे स्वप्न साकारण्याच्या कार्याने ते लोकजिवनात अजरामर आहेत. आपल्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक रेल्वे स्थानकात माजी खासदार व केंद्रीय रेल्वे व अर्थमंत्री, कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधू दंडवते यांचे तैलचित्र ठळक ठिकाणी लावण्यात यावे अशी मागणी स्मारक समितीच्यावतीने करण्यात आली आहे. त्याचबरोबर सावंतवाडी रेल्वेस्थानकाला टर्मिनस म्हणून जाहीर करुन कार्यान्वित करावे तसेच या टर्मिनसचे ‘प्रा. मधू दंडवते’ यांचे नाव देऊन नामकरण करावे अशी प्रमुख मागणी केली आहे.

तर कोकण रेल्वेच्या सावंतवाडी, मडुरा, झाराप या स्थानकावर प्रा. दंडवतेंचे तैलचित्र प्रवेशद्वार ठिकाणी भिंतीवर लावण्यात यावे, रत्नागिरी रेल्वे स्थानक ते महामार्ग रस्त्याला ‘प्रा. मधू दंडवते मार्ग’ असे नाव देण्यात यावे, प्रा. मधू दंडवते यांच्या नावे रेल्वे सुरु करावी किंवा विद्यमान रेल्वे गाडीचे नामांतरण करावे, सावंतवाडी रेल्वे स्थानकाला टर्मिनस दर्जा देऊन कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा आदी मागण्या कोकण रेल्वे कॉर्पोरेशनकडे निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, २६ जानेवारी २०२४ पर्यंत याची अंमलबजावणी करण्यात यावी. अन्यथा, कोकणचे लोक कोकण रेल्वे कार्यक्षेत्रातील सर्व रेल्वे स्थानकावर लाक्षणिक धरणे आंदोलन करू असा इशारा देखील को.रे. प्रशासनाला देण्यात आला आहे.

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ**

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*;

प्रतिक्रिया व्यक्त करा