विविध मागण्यासाठी आशाताई व गटप्रवर्तक यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
ओरोस
जिल्ह्यातील आशा प्रवर्तक व गट प्रवर्तक यांच्या माध्यमातून काल सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी साडेपाचशेहून अधिक आशा व गटप्रवर्तक या मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी निवासी जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देऊन आमच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवा, अशी मागणी यावेळी आशाताई करण्यात आली. येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून या मोर्चाची सुरुवात करण्यात आली. रणरणत्या उन्हात सुद्धा मोठ्या प्रमाणात या मोर्चाला प्रतिसाद लाभला. ज्यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.