राष्ट्रीय काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी पदाधिकाऱ्यांसमवेत देवगड ग्रामीण रुग्णालय, पोलीस स्टेशनला दिली भेट
देवगड
देवगड ग्रामीण रुग्णालयात उबाठा सेना व भाजपा यामध्ये झालेल्या राजकीय राड्यानंतर राष्ट्रीय काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी मंगळवारी सायंकाळी देवगड येथे येऊन देवगड पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे व देवगड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय विटकर यांची भेट घेतली.
देवगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्याशी कालच्या ग्रामीण रुग्णालयात घडलेल्या घटनेबाबत सविस्तर चर्चा केली. तसेच देवगड ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अध्यक्ष यांच्याशी सविस्तर चर्चा करून रिक्त पदे भरण्यासाठी आपण देखील वरिष्ठ पातळीवरून पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. तसेच या रुग्णालयासाठी सत्ता नसताना देखील खाजगी खाजगी रुग्णसेवा सर्वसामान्य जनतेला परवडणारी नाही म्हणून सर्वसामान्य जनतेला सोयीस्कर व्हावे यासाठी 23 लाखाचा निधी जिल्हा डेंटल विभागाला देत असल्याचे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख यांनी सांगितले. देवगड ग्रामीण रुग्णालयात पुरेसा कर्मचारी वर्ग उपस्थित नसताना देखील सर्व सुरळीत सुरू आहे, अशी चुकीची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिल्याने हा प्रसंग उद्धभला आहे.
राजकीय लोकप्रतिनिधींची दिशाभूल करण्यासाठी अशी माहिती तुम्ही देऊ नका अन्यथा असे प्रसंग वारंवार घडतील असेही यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना सांगितले . सत्ताधारी मंडळी खोटी आश्वासने देऊन सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करतात.
यानंतर काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी शिवसेना उबाठा सेनेचे युवासेना तालुकाप्रमुख गणेश गावकर यांची देवगड उबाठा सेनेच्या पक्ष कार्यालयात भेट घेतली. यावेळी देवगड राष्ट्रीय काँग्रेस तालुकाध्यक्ष उमेश कुलकर्णी,युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर, सुगंधा साटम, उल्हास मणचेकर सज्जाउद्दीन सोलकर, प्रकाश जैतापकर,गणपत वालकर तुषार भाबल,विनायक म्हापसेकर कणकवली तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर आदी उपस्थित होते.
*संवाद मीडिया*
*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘
*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*
🥜 *आमची उत्पादने*🥜
*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*
🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒
*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*
*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*
*🌎 www.sunandaai.com*
*✉️ sunandaaikrushi@gmail.com*
*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ**
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*