*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम बालकविता*
*विंडोसीट हवी* ( बाल कविता )
आज विमानात बसून
उंच आकाशात जाईन
पऱ्या आणि देवदुतांचं
सारं जग मी पाहीन
सुंदर त्यांचे मुकुट अन
अदभूत त्यांचे पंख
आज पाहुन घेईन मी
गोष्टीतले जादूई शंख
तिथे म्हणे सारीकडे
झरे अमृताचे वाहतात
रोज संध्याकाळी दारीं
अत्तराचे दिवे लावतात
ढगात लपला चांदोबा
चांदण्यांशी खेळ खेळतो
पहाटेला पक्षांसोबत
गोड गोड गाणी गातो
दळण दळणारी आजी
ढगात तिला पाहुन घेईन
“हळू दळत जा बाई ”
नक्की तिला सांगून येईन
पोपट, मैना, राघू, गाती
तिथे रोज गाणी नवी
सारं काही पहायला आई
मला विंडोसीट हवी
श्रीनिवास गडकरी
रोहा पेण पुणे
9130861394
केवळ नावासहितच पुढे पाठवावे
@ सर्व हक्क सुरक्षित