You are currently viewing सावंतवाडी पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी प्रशासकीय मान्यता

सावंतवाडी पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी प्रशासकीय मान्यता

सावंतवाडी पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी प्रशासकीय मान्यता

नूतन इमारत बांधकामासाठी १४ कोटी ५० लाख रूपये मंजूर

शिरोडा नाका येथे उभी राहणार भव्य नूतन इमारत

सावंतवाडी

सावंतवाडी पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारत बांधकामाच्या १४ कोटी ५० लाख रूपये इतक्या अंदाजपत्रकीय किंमतीच्या कामांस शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यामुळे सावंतवाडी पंचायत समिती नूतन इमारतीचा गेली अनेक वर्षे भिजत घोंगडी राहिलेला प्रश्न अखेर निकाली लागला आहे. महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी हा निधी मंजूर केला असून त्याबाबतचा शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे. त्यामुळे आगामी दोन ते तीन महिन्यात जिल्हा परिषद कडून तांत्रिक मान्यता व कार्यारंभ आदेश प्राप्त झाल्यानंतर सद्यस्थितीत शिरोडा नाका येथे असलेल्या पंचायत समितीच्या जागेतच नवीन प्रशस्त इमारत उभी राहणार आहे.

सावंतवाडी पंचायत समितीची सालईवाडा येथे असलेली इमारत अत्यंत जीर्ण झाल्याने त्या जागी नवीन प्रशस्त इमारत व्हावी असा प्रयत्न गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून सुरू होता. सुरुवातीच्या काळात सावंतवाडी शहरातील भटवाडी येथे असलेल्या जिल्हा परिषदेच्या जागेत इमारत होण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यावेळी नूतन इमारतीसाठी २ कोटी १५ लाख रुपये मंजुरीही प्राप्त झाली होती. मात्र, त्याला मूर्त रूप मिळू शकले नाही.
मध्यंतरीच्या काळात सालईवाडा येथील इमारत अतिशय जीर्ण व धोकादायक झाल्याने ४ वर्षांपूर्वी सदरची इमारत शिरोडा नाका येथील जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाच्या जागेत स्थलांतरित करण्यात आली. येथील प्रशासकीय कार्यालये बांधकाम विभागाच्या गोदामात तर अन्य सभापती, उपसभापती व गटविकास अधिकारी यांची दालने समोरील इमारतीत स्थलांतरित करण्यात आली.

त्यानंतर सावंतवाडी पंचायत समितीच्या नूतन इमारतीसाठीचा नवा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग यांनी पंचायत समिती, सावंतवाडी येथील नवीन प्रशासकीय इमारत बांधकामाच्या रु.२ कोटी १५ लक्ष १३ हजार किंमतीच्या अंदाजपत्रकास दिलेली प्रशासकीय मान्यता रद्द करुन नव्याने प्रस्तुत इमारतीच्या नविन प्रशासकीय इमारत बांधकामास प्रशासकीय मान्यता देण्याची विनंती केली होती. नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम सावंतवाडी येथील जिल्हा परिषदेच्या ताब्यात असलेल्या भूमापन क्रमांक ४५९२ या २००८.८३ चौ. मी. या मोकळ्या क्षेत्रावर करण्यात येणार असून सदर जागा ही “मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग” यांच्या नावावर आहे. अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग यांनी पंचायत समिती, सावंतवाडी नवीन प्रशासकीय इमारतीकरिता मुख्य वास्तुशास्त्रज्ञ सा. बां. प्रादेशिक विभाग, मुंबई यांचे क्रमांक Job No. Sindhudurga/ 2761 / DRG No. 4, 5 & 6 या नमुना नकाशावर आधारित, सन २०२१- २२ च्या दरसूचीवर आधारित रू.१४ कोटी ५० लक्ष किंमतीचे सविस्तर अंदाजपत्रक सादर केले होते. आज अखेर या अंदाजपत्रकाला शासकीय मान्यता मिळाली असून सावंतवाडी पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारत बांधकामाच्या १४ कोटी ५० लाख रूपये इतक्या अंदाजपत्रकीय किंमतीच्या कामांस शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे.

त्यामुळे तब्बल १५ वर्षांहून अधिक काळ पंचायत समितीच्या इमारतीसाठी सुरु असलेला वनवास आता संपणार आहे. सदर बांधकामासाठी संबंधित सक्षम प्राधिकाऱ्याची तांत्रिक मान्यता प्राप्त झाल्यानंतर अनुदान स्वरूपात, टप्प्या-टप्प्याने निधी उपलब्ध करून दिला जाणार असून, तो उपलब्धतेनुसार अर्थसंकल्प वितरण प्रणाली (BDS) द्वारे वितरीत करण्यात येणार आहे. यावरील खर्च “२५१५-इतर ग्रामीण विकास कार्यक्रम १०१, पंचायती राज ३१ सहाय्यक अनुदाने (०१) (०३) जिल्हा परिषदांच्या इमारती बांधकामासाठी जिल्हा परिषदांना सहाय्यक अनुदाने (२५१५ ००५३)” या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा, असे आदेश शासन निर्णयाद्वारे निर्गमित करण्यात आले आहेत. प्रस्तुत प्रशासकीय इमारत बांधकामामध्ये ग्रीन बिल्डींग संकल्पना अंमलात आणून, नैसर्गिक प्रकाशयोजना व वायुवीजन, पाण्याच्या व उर्जेच्या वापरात काटकसर, पर्जन्य जलपुनर्भरण आणि जास्तीत जास्त पर्यावरणपूरक बांधकाम साहित्य व साधन सामुग्रीचा वापर करणे आवश्यक राहील.

तर प्रस्तुतचे काम हाती घेतल्यापासून जास्तीत जास्त दोन वर्षात पूर्ण करण्यात यावे अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
त्यामुळे शिरोडा नाका येथे सद्यस्थितीत असलेल्या पंचायत समितीच्या इमारतीची जागा सपाटीकरण करून त्याजागी आता १४ कोटी ५० लाख रुपये मंजूर करण्यात आलेली नवी भव्य व प्रशस्त अशी पंचायत समितीची इमारत उभी राहणार आहे. . यासाठी दोन वर्षांचा विहित कालावधी देण्यात असल्यामुळे आगामी दोन वर्षात सावंतवाडी पंचायत समितीची नवी इमारत उपलब्ध होणार आहे.

*संवाद मीडिया*

सादर करीत आहोत
🇮🇳भारतातील विक्रीचे सर्व उच्चांक मोडलेली🇮🇳

*All New NEXON* _way ahead_
*तुमचे व्यक्तिमत्त्व खुलावेल असे डिझाईन*

💫 सहा एअर बॅग्स युक्त (कॉमन फिचर)
💫आकर्षक एल ई डी लँप
💫 ई – शिफ्टर मल्टि ड्राइव्ह मोड सहित
💫 व्हॉईस कमांड युक्त इलेक्ट्रिक सनरूफ
💫 अत्यंत आकर्षक अंतर्गत सजावट
💫५ स्टार सेफ्टी रेटिंग सहित
💫 डायमंड कट ॲलॉय व्हील
💫 आणि बरेच काही..!!!

*आपण आणि आपले कुटुंबीय सुरक्षित आहात केवळ टाटा कार्स मध्येच…*

आजच टेस्ट ड्राइव्ह,डेमो, एक्सचेंज,१००% ऑन रोड फायनान्स करिता भेट द्या अथवा कॉल करा

*एस.पी. ऑटोहब*
रत्नागिरी | चिपळूण | कणकवली

*7377-959595*

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*संपुर्ण स्वदेशी अभियान*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/111578/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*6

प्रतिक्रिया व्यक्त करा