You are currently viewing जादूटोणाविरोधी कायदा सर्वांसाठी – नंदिनी जाधव

जादूटोणाविरोधी कायदा सर्वांसाठी – नंदिनी जाधव

जादूटोणाविरोधी कायदा सर्वांसाठी – नंदिनी जाधव

वैभववाडी

धर्माच्या नावाखाली चालणाऱ्या अनिष्ट प्रथा, परंपरांना प्रतिबंध करणारा जादूटोणाविरोधी कायदा-२०१३ हा एक महत्त्वाचा कायदा आहे. सदर कायदा समजून घेऊन त्याचा प्रचार, प्रसार व अंमलबजावणी करण्याची सर्वांची जबाबदारी आहे असे आवाहन अंनिसच्या कार्यकर्त्या नंदिनी जाधव यांनी केले.
वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था संचलित आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील विवेक विचार कक्षाच्यावतीने (RTC) जादूटोणा विरोधी कायदा-२०१३ च्या जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने आयोजित प्रबोधन कार्यक्रम प्राचार्य डॉ.सी. एस. काकडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
यावेळी व्यासपीठावर जनसंवाद यात्रेतील अंनिसचे कार्यकर्त्या नंदिनी जाधव, मिलिंद देशमुख, भगवान रणदिवे व अनंत पवार उपस्थित होते.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष शहीद डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्या प्रयत्नातून निर्माण झालेला जादूटोणाविरोधी कायदा-२०१३ हा सर्वांसाठी आहे. या कायद्यातील एकूण बारा कलमे याबाबत सविस्तर माहिती नंदिनी जाधव यांनी दिली. भगवान रणदिवे यांनी पाणी व बिनवातेचा दिवा पेटवून
तसेच अंगात येण आणि जिभेवर कापूर पेटवून खाण्याचा चमत्काराचे सादरीकरण करुन दाखवले. मिलिंद देशमुख यांनी महाराष्ट्र अंनिस’ च्या कामाची ओळख करून देत समाजामध्ये असणाऱ्या विविध अंधश्रद्धा आणि त्याविषयीचे कायदे याबाबतची माहिती दिली. तसेच आरोग्य हीच संपत्ती आणि निर्व्यसनी कसे राहावे याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी नशिबावर विसंबून न राहता प्रयत्नाने यश मिळवता येते यावर विश्वास ठेवावा असे प्राचार्य डॉ.सी.एस.काकडे यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मान्यवरांची ओळख प्रा. एस. एन. पाटील यांनी करुन दिली तर आभार प्रा.सौ. एस. एस. पाटील यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ‘विवेक विचार कक्षा’चे प्रा.डॉ. आर.एम. गुलदे, प्रा. डॉ. डी. बी. शिरगावकर यांनी विशेष प्रयत्न काम केले.

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ**

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा