*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा.सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणेचे लेखक कवी वि. ग. सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*
*शालिनता*
**********
आता संपले संवाद सारे
नुसते तोंडदेखले बोलणे
स्पर्श निर्जीवी भावनांचे
जगी फक्त स्वार्थी जगणे…..
इथे भावशब्दांची वानवा
कोण कुणाचे कोण जाणे
आकांक्षा भोळ्याभाबड्या
जगणेच सारे केविलवाणे…..
सुसंस्कार सारेसारे लोपले
मोहपाशी भोगवादी जगणे
दृष्टांत हेच या कलियुगाचे
जगी भरकटले बेधुंद जीणे…..
कोमेजली मृदुली शालिनता
प्रवाहात या निःशब्दी वाहणे
जिथे जिथे जावे तिथे तिथे
रुजले उत्थानी मुक्त फुलणे…..
***********************
*रचना क्र. १३७*
*#©️वि.ग.सातपुते.(भावकवी )*
*📞( 9766544908 )*