*साहित्यिका स्वप्नगंधा आंबेतकर यांच्या रेसिपीज*
*उपवासासाठी बटाट्याची भाजी*
साहित्य: बटाटे, भाजके शेंगदाणे, खजूर, तेल, मिरची, जिरे, मीठ, साखर, दही.
कृती:- ६ मोठे बटाटे स्वच्छ धुवून साले काढून बारीक कापून घेणे.
एक वाटी भर भाजलेल्या शेंगदाणा्याची भरड, एक वाटी खजूर
भांड्यात तापलेल्या तेलात मूठभर मिरचीचे तुकडे, दोन चहाचे चमचे जिरे फोडणीत घालणे.
नंतर बटाटे फोडी घालून परतून घेणे, खजूर, शेंगदाणा भरड घालणे. झाकणावर पाणी ठेवून वीस मिनिटाने परतून त्यात मीठ, साखर चवीप्रमाणे , आवडीप्रमाणे घालणे, ढवळणे.
झाकणावर पाणी ठेऊन मंद आचेवर
दहा ते पंधरा मिनिटे शिजविणे.
नंतर घट्टसर दह्याबरोबर सर्व्ह करणे.
डेकोरेशन
सवडीप्रमाणे, आवडीप्रमाणे,भुकेनुसार
🌹🌹🌹🌹
स्वप्नगंधा सतीश आंबेतकर