*महायोगोत्सव २०२३ साठी नागपूर येथे पाहणी दौरा*
नागपूर (गुरुदत्त वाकदेकर) :
महाराष्ट्र योगशिक्षक संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मनोज निलपवार यांच्या मार्गदर्शनाखाली, राज्य निरीक्षक महाराष्ट्र राज्य कोषाध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, मुंबई जिल्हाध्यक्ष संतोष खरटमोल यांनी राज्यस्तरीय महायोगोत्सव २०२३ नागपूर साठी नागपूर येथे जाऊन पाहणी दौरा केला.
यादरम्यान नागपूर टीमकडून प्रसाद कुलकर्णी आणि संतोष खरटमोल यांचे मोठया आनंदात स्वागत करण्यात आले. डॉ. हेडगेवार भवन येथे २८-२९ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय महायोगोत्सवच्या कार्यक्रम स्थळी भेट देऊन त्याची पाहणी करण्यात आली. यात सभागृह व्यवस्था, गेस्ट रूम, सदस्य बैठक व्यवस्था, साधकांची दोन दिवस राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, मान्यवरांच्या व्याख्याअचे आयोजन कशाप्रकारे करता येईल याच्यावर चर्चा करण्यात आली. नागपूर टीमकडून होणाऱ्या महायोगोत्सव मधील कामाचा आढावा घेण्यात आला. राज्यस्तरीय महायोगोत्सव मधील प्रत्येक समितीच्या कामाची विभागणी करून देण्यात आली. प्रत्येक समितीच्या प्रमुखाला रीतसर मार्गदर्शन करण्यात आले. नागपूर जिल्ह्यातील सर्वच पदाधिकारी आणि सदस्य हे अगदी जोमाने काम करीत आहेत, हे त्यांच्या कामाचा आढावा घेताना दिसून आले.
याप्रसंगी विभागीय अध्यक्ष विनायकजी बारापत्रे, राज्य महासचिव अमितजी मिश्रा, नागपूर जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तमजी थोटे, स्थानिक नियोजन समिती अध्यक्षा लता होलगरे, कोषाध्यक्षा उषा हिंदोरीया, उपाध्यक्षा सुवर्णा पाल, मनोहर पाल, श्री. ढोबळे, श्री. जांभूळकर यांच्यासह पन्नासहून अधिक सदस्य उपस्थित होते.
*संवाद मीडिया*
सादर करीत आहोत
🇮🇳भारतातील विक्रीचे सर्व उच्चांक मोडलेली🇮🇳
*All New NEXON* _way ahead_
*तुमचे व्यक्तिमत्त्व खुलावेल असे डिझाईन*
💫 सहा एअर बॅग्स युक्त (कॉमन फिचर)
💫आकर्षक एल ई डी लँप
💫 ई – शिफ्टर मल्टि ड्राइव्ह मोड सहित
💫 व्हॉईस कमांड युक्त इलेक्ट्रिक सनरूफ
💫 अत्यंत आकर्षक अंतर्गत सजावट
💫५ स्टार सेफ्टी रेटिंग सहित
💫 डायमंड कट ॲलॉय व्हील
💫 आणि बरेच काही..!!!
*आपण आणि आपले कुटुंबीय सुरक्षित आहात केवळ टाटा कार्स मध्येच…*
आजच टेस्ट ड्राइव्ह,डेमो, एक्सचेंज,१००% ऑन रोड फायनान्स करिता भेट द्या अथवा कॉल करा
*एस.पी. ऑटोहब*
रत्नागिरी | चिपळूण | कणकवली
*7377-959595*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*संपुर्ण स्वदेशी अभियान*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/111578/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*