You are currently viewing साहित्यिका सौ.स्वप्नगंधा आंबेतकर यांच्या रेसिपीज

साहित्यिका सौ.स्वप्नगंधा आंबेतकर यांच्या रेसिपीज

*उपवासाच्या बटाट्याच्या आंबटगोड वड्या*

 

अर्धा किलो स्वच्छ केलेले उकडलेले बटाटे स्मॅश करुन घेणे

जाडसर पॅनमध्ये गॅसवर साजूक तुपावर बटाटे, साखर दोन वाट्या

एकत्र चांगले घाटून घेणे.

दोन वाट्या खवा,

एक वाटी दही

तूपावर चांगले मंद आचेवर परतून घेणे,

तसेच सुकामेवा किसमिस एक वाटी भर वेगळे परतवून घेणे.

एका परातीत

फक्त बटाटे, खवा, दही, वेलची पूड हे मळून त्याचे छोट्या लिंबाएवढे गोळे करुन ते पुरणासारखे पोळीच्या पीठात भरुन त्याच्या पोळ्या ही करु शकतो.

 

व तसेच वरील मिश्रणात सुक्या मेव्याचे मिश्रण टाकून ते एकजीव करुन घ्यावे. त्यात सुगंधी पूड टाकून ते मिश्रण परातीत साजूक तूप लावून पसरवून घ्यावे, आपल्या आवडीच्या आकाराच्या ‌वड्या सुरीने पाडून घ्याव्यात. फ्रीजमध्ये थोडावेळ ठेवून घट्ट होऊ द्याव्यात.

नंतर काढून सुट्या करुन खाऊन उरलेल्या पुन्हा स्टीलच्या डब्यात भरुन ठेवाव्यात. फ्रीजमध्ये ठेवल्या तर खाताना छान आंबटगोड लागतात.

 

कोणताही पदार्थ करतांना आधी थोड्या प्रमाणातच करणे..

🌹🌹🌹🌹

स्वप्नगंधा सतीश आंबेतकर

विरार

प्रतिक्रिया व्यक्त करा