You are currently viewing लढायचं सोडून…

लढायचं सोडून…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*लढायचं सोडून …*

 

लढायचं सोडून कधी पळायचं असतं का

डोकं दुखलं म्हणून उखळात घालायचं असतं का.

 

निर्माल्य होईल म्हणून फुलायचं नसतं का

वृद्धत्व येईल म्हणून जगायचं नसतं कां …

 

शिशिर येईल म्हणून गळायचं नसतं का

वसंत आल्यावर फुलायचं कोणी थांबत का..

 

उंबराचं फूल कधी मागायचं असतं का?

गुलाब हाती आला तरी हसायचं असतं ना..

 

आकाशातील चंद्र कधी मागायचा असतो का

दुधाळ चांदण्यात बसून नहायचं असतं ना…

 

नक्षत्रे हाती येणार नाहीत हे माहित असतं ना

त्यांचे सुंदर विभ्रम पाहून कोणी खुलायचं थांबतं का…

 

ऊन सावलीचा खेळ अविरत चालतो ना

मग त्याची सवय करून घ्यायची असते ना…

 

सतत नन्नाचा पाढा वाचायचा असतो का

आहे त्यात समाधानी रहायचं असतं ना…

 

धाप लागून संपेल जीवन इतकं धावायचं असतं का

पानथळ जागा दिसताच थांबायचं असतं ना…

 

काय करू करू नको हे प्रत्येकाला कळते ना

मग वेड पांघरून पेडगांवला जायचं असतं का…

 

साऱ्याच प्रश्नांची उत्तरे माहित असतात ना

ती शोधायची सोडून रडगाणं गायचं असतं का..

 

जीवनाकडे पाठ फिरवून पळणारा शहाणा नसतो ना

जीवनात राहूनच शहाणपण मिळवायचे असते ना…

 

प्रा.सौ.सुमती पवार UK

(9763605642)

 

प्रतिक्रिया व्यक्त करा