*जागतिक साहित्य कला व्यक्तीत्व* *विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम अष्टाक्षरी काव्यरचना*
*स्त्री*
युगे युगे आदिमाया
घेते इथे अवतार
तीच जननी ती आई
सावरते भुईभार।।
मातृभाषा मातृसत्ता
गंगा वाहे संस्कारांची
सांभाळते तोल जगी
कास धरी विवेकाची।।
झाली अहिल्या जानकी
सत्ता पुरुषी मानुनी
अभागिनी सांगतात
*तिच्या स्रीत्वाची* *कहाणी।।*
काळ पाहता कठीण
झुगारल्या परंपरा
राणी लक्ष्मी तीअहिल्या
जिजाऊने दिला हिरा।।
साऊमाय थोर झाली
लेकी शिक्षित करूनी
जीवनाचा भाग काव्य
बहिणाई सांगे कानी।।
दीपवुनी विश्व सारे
तळपते सौदामिनी
वादळाशी झुंज देते
*तिच्या स्रीत्वाची कहाणी*।।
〰️〰️〰️〰️〰️〰️
*कवयित्री ..अरुणा दुद्दलवार*
*दिग्रस… जिल्हा यवतमाळ