मुंबई:
नूतन गुळगुळे फाउंडेशन या दिव्यांग सेवाभावी संस्थेने. मुंबईत, विलेपार्ले (पूर्व) येथील, पु. ल. देशपांडे सभागृह, लोकमान्य सेवा संघ, या ठिकाणी आठवा राष्ट्रीय दिव्यांग ध्येयपूर्ती पुरस्कार सोहळा, शनिवार दि. ०७ ऑक्टोबर २०२३, रोजी सायंकाळी ५.०० वाजता आयोजित केला आहे. या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून, आयपीएस अतिरिक्त पोलीस महासंचालक. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग. मा. श्री विश्वास नांगरे पाटील, शौर्यचक्र विजेते कमांडो मा. श्री मधुसुधन सुर्वे, संपादक व व्यवसाय प्रमुख झी २४ तास मा. श्री निलेश खरे, उप. व्यवस्थापकीय संचालक, एस बी आय जनरल इन्शुरन्स लि. चे मा. श्री आनंद पेजावर, अध्यक्षा एन के जी एस बी बँक मा. सौ हिमांगी नाडकर्णी, निमंत्रक : NGF अध्यक्षा सौ नूतनताई विनायक गुळगुळे, हे सर्व प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. डॉ. प्रकाश बाबा आमटे, आणि मा. डॉ. मंदाकिनी प्रकाश आमटे आहेत. या समारंभादरम्यान “स्वयंभू-निनाद” श्री निनाद आजगावकर यांच्या सुरेल गाण्यांची मैफिल होणार आहे. या मैफिलीचे सूत्रसंचालन : श्री मंदार खराडे – (RJ, FM GOLD) करतील. पुरस्कार समारंभाचे सूत्रसंचालन : सौ नीता माळी
करणार आहेत.
या संस्थेने गेल्या सात वर्षात साठ प्रेरणादायी दिव्यांगांना हा पुरस्कार दिला आहे. लोकांच्या मनात बहुविकलांगांनविषयी जनजागृती व्हावी आणि त्यातून त्यांनी दिव्यांगांना जमेल ते सहकार्य द्यावे. ही अपेक्षा नूतन गुळगुळे फाउंडेशनची आहे. म्हणून ही संस्था त्यांनी निर्माण केली आहे. NGF संस्थेने
ग्रामीण भागातील दिव्यांग बालक व त्यांच्या एकल पालकाकरता अर्नाळा, विरार या ठिकाणी विनामूल्य वसतीगृह उभारण्याची, स्वानंद सेवासदन इमारत योजना तयार केली आहे. त्यानुसार ही इमारत पुढच्या काही दिवसात पूर्ण होइल. या वास्तूच्या सुसज्जतेसाठी सढळ हस्ते सहकार्य करावे असे आवाहन NGF संस्थेने केले आहे. दानशुर व्यक्तींना “80G” व “CSR- 1” अंतर्गत आयकरात सवलत मिळेल. हा पुरस्कार सोहळा NGF युट्युब चॅनेल आणि फेसबुक पेज वरून लाईव्ह प्रक्षेपित केला जाणार आहे. त्यामुळे हा कार्यक्रम आपण याची देही याची डोळा ! पहावा. आणि दिव्यांग व्यक्तींकडून प्रेरणाघ्यावी. ही माहिती NGF ठाणे सदस्य साहित्यिक, पत्रकार एडवोकेट रुपेश पवार यांनी दिली आहे.
NGF संस्था
9930852165