*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य लेखिका कवयित्री रेखा काळे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*”पितृपक्ष”*
देता निरोप गणरायाला
सुरुवात होते पितृपक्षाला
स्मरुनी आपल्या पितरांना
बोलावत असे जेवायला !!
भाज्यांचे ते किती प्रकार
वडी,कढिचा थाट न्यारा
पुरणपोळीचा नैवेद्य खास
पंचपक्वान्नाच्या बेत प्यारा !!
कावळयाची आर्जव भारी
ताट मांडीतसे उंचावरी
होता काकस्पर्श नैवेद्याला
कृतार्थ भाव दाटतो उरी !!
स्मरा ॠण मायबापाचे
जाणु त्यांचे महत्त्व
त्यांच्यामुळे आहे जगात
आज आपले अस्तित्त्व!!
त्यांच्या पुण्याईने आज
आपण स्वर्गसुख भोगतो
आदर, प्रेमाने त्यांचे
चरणकमल पूजितो!!
आहे तोवरच मायबापाची
मनोभावे करावी सेवा
थाटमाट पितरांचा व्यर्थ
जपू संस्कृती चा ठेवा
रेखा काळे