केर व भेकुर्ली मध्ये वन्यजीव सप्ताह
दोडामार्ग
भारतात १९५२ पासून वन्यजीव सप्ताह साजरा केला जात आहे. ऑक्टोबर महिन्याच्या पहील्या आठवड्यात हा वन्यजीव सप्ताह साजरा होतो. नामशेष होत चाललेल्या वन्य पशु-पक्षांबाबत जागृती निर्माण करणे हा त्यामागील हेतू आहे.
याचे औचित्य साधून केर,निडलवाडी प्रशालेतील विद्यार्थ्यांना केर प्रशालेत दि -०५ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी १० वा. तर भेकुर्ली शाळेत दि-०६ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी १० वा. “वाईल्ड लाईफ काॅन्जर्वेशन ट्रस्ट” व “वनश्री फाउंडेशन सिंधुदुर्ग” यांच्या माध्यमातून कार्यक्रम आयोजित केलेला आहे. यावेळी जनजागृती कार्यक्रम, माहितीपर चित्रफीती, बौद्धिक वर्ग, साहीत्य वाटप होणार आहे.
यावेळी मार्गदर्शक म्हणून जीवशास्त्रज्ञ तथा देश पातळीवरील टायगर रिसर्चर श्री.गिरीश पंजाबी सर व संपूर्ण टीम उपस्थित राहणार आहे.