रिक्त पदांमुळे रुग्णांची गैरसोय – गणेश गावकर
रिक्त पदे भरा, अन्यथा तीव्र आंदोलन..
देवगड
देवगड ग्रामीण रुग्णालयात सद्यस्थितीत वैद्यकीय अधिकारी ,आरोग्य सेविका, अन्य पदे रिक्त असून ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना अत्यावश्यक सोयी सुविधा उपलब्ध होत नाहीत. प्रसंगी रुग्णाला देणाऱ्या रुग्णांना साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव असताना देखील त्यावर उपचार केले जात नाहीत. अशा वाढत्या तक्रारीच्या अनुषंगाने मंगळवारी युवासेना तालुकाप्रमुख गणेश गावकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय देवगड यांची भेट घेतली असता वैद्यकीय अधीक्षकांच्या अनुपस्थितीत वैद्यकीय अधिकारी डॉ श्रुती केळकर यांच्याशी या संदर्भात सविस्तर चर्चा केली .
प्रामुख्याने ग्रामीण रुग्णालयात येणाऱ्या आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधा किंवा उपचार केले जात नसून रुग्णालयात अधिक उपचार करण्याचा दाखल करून न घेता अन्य रुग्णालयात पाठविण्यात येते. एकंदरीत या रुग्णालयात रिक्त असलेले या पदांची माहिती तात्काळ देण्यात यावी .अशी मागणी या शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आली या पुढील काळात रिक्त पदांबाबत व रुग्णांचे होत असलेल्या गैरसोईबाबत येत्या आठ दिवसात योग्य ती कार्यवाही न झाल्यास शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख गणेश गावकर यांनी यावेळी बोलताना दिला. यावेळी त्यांच्यासमवेत महिला संघटक हर्षा ठाकूर ,नगरसेवक नितीन बांदेकर, बाळा कणेरकर,अमित तोडणकर, गणपत जाधव ,माजी नगरसेवक विकास कोयंडे ,प्रविंद कावले, उदय करंगुटकर ,महेंद्र भुजबळ, योगेश गोळम व अन्य उपस्थित होते .