विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयात व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचे आयोजन
कणकवली
युवक कल्याण संघ, कणकवली संचलित विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी, शिरवल महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्व विकास चे योग्य प्रकारे मार्गदर्शन करण्यासाठी दिनांक १४ सप्टेंबर ते १६ सप्टेंबर २०२३ या कालावधीत सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये सदर कार्यक्रमाच्या माध्यमातून तीन दिवसीय विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा संपन्न झाली. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे खजिनदार श्री मंदार सावंत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश जगताप व मार्गदर्शक श्री किरण परांडेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या वेळी सदर कार्यक्रमाच्या सुरवातीस कु. अपूर्वा कामत हिने प्रास्ताविक करून सर्व उपस्थितांचे स्वागत केले. मार्गदर्शक श्री किरण परांडेकर यांनी चारित्र्य मूल्यांचे महत्व आणि व्यक्तिमत्व विकास या विषयावर आपले मत व्यक्त केले. विविध कौशल्य विकास, संभाषण कौशल्य, बायोडाटा कसा लिहावा याचे त्यांनी प्रात्यक्षिक दिले आणि हे सर्व विद्यार्थ्यांना खूप उपयुक्त ठरले. या व अशा अनेक बाबींची माहिती या कार्यशाळेतून देण्यात
आली. प्रश्न आणि संवाद हे सत्र घेण्यात आले. त्यास सर्व विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.
या कार्यशाळेसाठी संस्थेचे अध्यक्ष आमदार श्री. वैभवजी नाईक, तसेच संस्थेचे सचिव श्री. रमण बाणे, व्यवस्थापकीय विश्वस्त श्री. मंदार सावंत, प्राचार्य डॉ. राजेश जगताप, विभागप्रमुख श्री. चंद्रशेखर बाबर, श्री. अमर कुलकर्णी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सदर कार्यशाळेचे नियोजन महाविद्यालयाचे ट्रेनिंग व प्लेसमेंट विभाग प्रमुख श्री. सचिन गोरड यांनी केले व आभार व्यक्त केले.