You are currently viewing फोंडाघाट- मारुतीवाडी चा गणपती विसर्जन सोहळा, भावी पिढीसाठी आदर्शवत 

फोंडाघाट- मारुतीवाडी चा गणपती विसर्जन सोहळा, भावी पिढीसाठी आदर्शवत 

फोंडाघाट- मारुतीवाडी चा गणपती विसर्जन सोहळा, भावी पिढीसाठी आदर्शवत

फोंडाघाट

गणेश विसर्जनाचा सोहळा पार पडला असला, तरी बाल गोपाळ मित्र मंडळ, फोंडाघाट- मारुती वाडीच्या शिस्तबद्ध संस्कारक्षम मिरवणूक सोहळ्याचे कौतुक, अजूनही फोंडा पंचक्रोशीमध्ये ऐकू येत आहे. निमित्त आहे गणपती विसर्जनाचे ! मारुतीवाडी मध्ये पारंपारिक ढोल ताशाच्या गजरात, वाडीवरील लहान- थोर,अगदी महिला सुद्धा, एक सारखा ड्रेस कोड चा वापर करून मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. कुठेही गुलालाची उधळण नाही. विनाकारण फटाक्याची आतषबाजी नाही. कानठळ्या बसविणारा डॉल्बीचा दणदणाट नाही, की लेसर शोचा भपका ही नाही. रस्त्याची एक बाजू रिकामी ठेवल्याने स्वयंसेवक ट्राफिक खंडित होणार नाही, याची काळजी घेत होते.आपापसात पुरुषांनी तर सर्वात पुढे महिलांनी ढोल- ताशांच्या व गणरायाच्या जयघोष करीत फेर धरला होता. त्यामुळे या औचित्यपूर्ण मिरवणुकीतून आपल्या हिंदू संस्कृती, संस्कार, पारंपारिकपणा आणि आदरभाव पदोपदी दिसून येत होता. यामध्ये युवाई चा सहभाग अन नियोजनाची शिस्तबद्धता,परिश्रम दिसून येत होते. हे भावी पिढीसाठी आदर्शवत होते. त्यामुळे विसर्जन करून परतणारा प्रत्येक जण मारुतीवाडीच्या या मिरवणूक सोहळ्याचे कौतुक करीत होता. शेवटी उगवाई नदीवर आरती झाल्यानंतर सर्व गणपतींना योग्य पद्धतीने निरोप देण्यात आला.

यावेळी राहुल शितोळे, सिद्धेश भोगटे,साई बारस्कर,चेतन शिरोडकर,हरिष शितोळे, भविष्य भोगटे,महेश महाडगुत,बाबा बिले, धनंजय हळदिवे,गौरव हळदिवे, मिहीर हळदिवे, प्रसाद हळदिवे,अक्षय हळदिवे, दिपक शितोळे,रुपेश पावसकर, राजेश पावसकर,उमेश पावसकर, श्रीराम शितोळे, आप्पा म्हसकर, अजिंक्य म्हसकर, प्रसाद हळदिवे, गुरुप्रसाद शितोळे,गौरेश म्हसकर, दिगंबर शितोळे, आनंद शितोळे,बंडू मर्यै, आनंद मर्यै, सचिन मर्यै,शिनु मायंडी , राजेश शिरोडकर राजेंद्र मोरये व महिला विनिता म्हसकर, संजना हळदिवे, वैशाली बिले, तृप्ती भोगटे, शशिकला शितोळे, धनश्री हळदिवे,शितल हळदिवे, विद्या पावसकर, गीता शितोळे, शालीनी हळदिवे, कुपेकर वहिनी,मिनल शिरोडकर, रश्मी शिरोडकर इ.लहान – थोर सहभागी झाले होते..

 

प्रतिक्रिया व्यक्त करा