*योग शिक्षक घडविणे म्हणजे समाज घडविणे-श्री गावडे काका महाराज*
*योगशिक्षणाच्या माध्यमातून श्री सदगुरू गावडे काका भक्त सेवा न्यास संस्थेच्या आणखी एका सामाजिक उपक्रमात भर- आ. वैभव नाईक*
*श्री सदगुरू गावडे काका भक्त सेवा न्यास माड्याचीवाडी कुडाळ या संस्थेमार्फत योगशिक्षण कॉलेजचा शुभारंभ*
योगा म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये मग्न होणे. जे काम आपण निवडले आहे त्या कामाची पूर्तता होण्यासाठी अंतर्मन, आपले विचार आणि बुद्धी एकाग्र असणे आवश्यक आहे. आपण स्पर्धात्मक जीवन जगत आहोत. त्यामुळे आपल्याकडे एक तरी कौशल्य असणे आवश्यक आहे. योग शिक्षक घडविणे म्हणजे समाज घडविणे आहे. योग शिक्षकाने योगाचे परिपूर्ण ज्ञान घेऊन ते इतरांना द्यावे.योग हि काळाची गरज आहे.ऑनलाईन पद्धतीने देखील हे शिक्षण दिले जाणार आहे. त्याचबरोबर रोगानुसार योगा असे महिन्यातून एकतरी शिबीर जिल्ह्यात राबविणार आहोत. असे प.पू. सदगुरू श्री गावडे काका महाराज यांनी सांगितले.
प.पू. सदगुरू श्री गावडे काका महाराज यांच्या श्री सदगुरू भक्त सेवा न्यास माड्याचीवाडी कुडाळ या संस्थेमार्फत यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अंतर्गत योगशिक्षण कॉलेज अभ्यासक्रमाचा शुभारंभ रविवारी श्री गावडे काका महाराज यांच्या हस्ते व कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.या अभ्यासक्रमात प्रथम वर्षाकरिता ५२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.मारिया अल्मेडा यांनी यावेळी योगाचे प्रात्यक्षिक दाखविले.
*आ. वैभव नाईक म्हणाले,* श्री सदगुरू भक्त सेवा न्यास माड्याचीवाडी कुडाळ ही संस्था अध्यात्मिक कार्याबरोबरच सामाजिक कार्यात अग्रेसर आहे. त्यात योगशिक्षण कॉलेजच्या माध्यमातून आणखी एका सामाजिक उपक्रमाची भर पडली आहे. निराधारांना आधार देण्याचे काम केले जात आहे. योगशिक्षक अभ्यासक्रमातून भविष्यात चांगली पिढी घडण्यास मदत होणार आहे. या कॉलजेच्या माध्यमातून घडणारे योग शिक्षक लोकांचे ताण तणाव मुक्त करणारे देवदूत ठरणार आहेत. योगाकडे करिअरच्या दृष्टीने देखील पाहिले पाहिजे. योग शिक्षण कॉलेजच्या माध्यमातून हजारो योग शिक्षक घडविण्याचा श्री गावडे महाराजांचा मानस लवकरच पूर्ण होईल. या कार्यक्रमाला मला निमंत्रण देऊन बोलण्याची संधी दिली हा देखील माझ्या जीवनातील आनंदाचा क्षण आहे. गावडे काका महाराज जो जो आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही देखील काम करू असे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले.
याप्रसंगी सौ. अर्चना घारे परब, ऍड. सुहास सावंत, रणजित देसाई, अतुल बंगे, श्वेता कोरगावकर,माड्याचीवाडी सरपंच सचिन गावडे, विघ्नेश गावडे, बंड्या सावंत, श्री सद्गुरू भक्त सेवा न्यास धार्मिकचे अध्यक्ष एकनाथ गावडे, सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय किनळेकर,केंद्र प्रमुख आनंद सावंत, केंद्र संयोजिका केसर वानिवडेकर,सहाय्यक योगशिक्षक प्रथमेश परब, दिलीप सुतार, गिरीधर गावडे, ऐश्वर्या गडकरी, शैलेश परब, मारिया अल्मेडा आदी उपस्थित होते.