You are currently viewing “ज्ञान भांडार”

“ज्ञान भांडार”

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार अरुण गांगल लिखित अप्रतिम गीत रचना*

 

*”ज्ञान भांडार”*

 

सर्व ज्ञानाचा पाया आहेत ज्ञानेश्वर

वाचावी ज्ञानेश्वरी असे अमृताची धार।।धृ।।

 

विठू रखुमाई लाभले माता पिता महान

भावंडे गुरू निवृत्ती मुक्ताई सोपान

ज्ञानेश्वरीने शिकविले जीवनाचे सार।।1।।

 

आळंदी क्षेत्र पुण्यभूमी अनन्य स्थान

रेड्यामुखी त्यांनी वदविले वेदवचन

चालविली निर्जीव भिंत दावीला चमत्कार।।2।।

 

अर्पिले ज्ञानाचे भांडार भेदाभेद टाळून

दिली शब्दकळा अमृत मळा फुलवून

लोक निंदा टाळून सर्वांचा केला उद्धार।।3।।

 

सर्वांसाठी मागितले ईश्वरा पसायदान

कार्य केले बहू घेतली समाधी संजीवन

संस्कृत गीतेचे केले मराठी भाषांतरII4II

 

श्री अरुण गांगल.कर्जत रायगड महाराष्ट्र.

पिन. 410201.

Cell.9373811677.

 

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा