तापसरीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात योग्य उपाय योजना राबवा – गुरुदास गवंडे
तहसीलदार श्रीधर पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी..
सावंतवाडी
गेले १५ दिवस पाऊस मोठ्या प्रमाणात पडत असून गावागावात अनेक ठिकाणी तापसरीचे रुग्ण आढळत आहे.त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात डेंगू चे रुग्ण आढळले आहेत.आरोग्य यंत्रणा कुठेही हवे तसे काम करताना दिसत नाही. याची आपण गांभीर्याने दखल घेऊन सावंतवाडी तालुक्यातील तालुका आरोग्य अधिकारी, आरोग्य केंद्र, उपकेंद्रे, डॉक्टर, आरोग्य सेवक आशासेविका, पंचायत समिती अधिकारी यांची तालुकास्तरावर तातडीची बैठक घेऊन यावर ग्रामपंचायत, शहरी भागात योग्य त्या उपाययोजना कराव्यात आ अशी मागणी मनसेचे माजी तालुकाध्यक्ष तथा निगुडे उपसरपंच गुरुदास गावंडे यांनी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्याकडे निवेदनद्वारे केली आहे.दरम्यान गावागावात सदर तापसरीच्या रुग्णांची नोंद ग्रामपंचायत स्तरावर आरोग्य यंत्रणेला सादर करून औषध, गोळ्या उपलब्ध करून द्याव्यात. आशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे.
याबाबत गवंडे यांनी दिलेल्या पत्रकात असे नमूद करण्यात आले की आज अनेक लोकांना गोवा मेडिकल कॉलेज या ठिकाणी जावं लागत आहे.या संदर्भात योग्य ते नियोजन करून आरोग्य यंत्रणेला अलर्ट करा व तात्काळ उपायोजना करा.एक जरी रुग्ण तपासारीने दगावला तर याला संपूर्ण प्रशासन जबाबदार असणार याची नोंद घ्यावी. केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या आदेशावरून स्वच्छता अभियानाचे नियोजन करण्याकरता प्रशासनाने ज्या पद्धतीने यंत्रणा राबविली तेच आरोग्य यंत्रणेच्या बाबतीत जर नियोजन केलं असतं तर गोवा बांबोळी सारख्या ठिकाणी रुग्णांना नेण्याची वेळ आली नसती सदर गोष्टीचे आपण तात्काळ दखल घेऊन योग्य ते कार्यवाही करावी अशी मागणी देखील गवंडी यांनी यावेळी निवेदनद्वारे केली आहे.