*ज्येष्ठ लेखिका कवयित्री स्वप्नगंधा आंबेतकर लिखित अप्रतिम लेख*
*चिंता कुणाला…*
*देवाला की,भक्ताला?*
खरं म्हणजे प्रत्येक प्रार्थनेत,मंत्रात अर्थ भरलेला आहे.
आपण सामान्य माणसे तो अर्थ जाणून न घेता प्रार्थना म्हणत असतो.
देवाच्या प्रत्येक कृतीमागे काहींना काही अर्थ भरलेला आहे.
ऋषिमुनींनी जी शास्त्रे लिहून ठेवली आहेत ती खरेतर अर्थ पूर्ण आहेत.
आताच्या नवयुगात,तंत्रयुगात
आपण त्या मार्गांचा अर्थही जाणून घेण्याच्या फंदात पडत नाहीत,कारण आपले जीवन वेगळेच आहे.वर्षानुवर्षे तपस्या करुन ऋषी मुनी सिद्धि प्राप्त करुन घेत असत, आणि आता आपल्याला सर्व सुख त्वरित हवी असतात.कारण धीर धरणे हे आपल्यात नाही.
तात्पर्य काय तर तो काळच वेगळा होता,आता जर आपण तसे करत बसलो तरआपले जगणेच कठीण होईल,जगात दहा टक्केच अशी धीर धरून सेवा करणारी माणसे असतात,
अगदी आज जरी प्रत्येकाने ठरवले की,मी तासनतास सेवेचा मार्ग अवलंबून प्रार्थना करत बसेन तर आपल्याला ते जमण्यासारखे नाही.
रोज आपण वास्तूशास्त्र, ज्योतिष शास्त्र या नियमांचे पालन करु शकत नाही,देवदेवतांच्या कथा,त्यांची महात्म्ये वाचली तर हजारो वर्षांच्या कालावधीनंतर या गोष्टी घडतात.शेवटी आपण फक्त आपल्याकडे असलेल्या वेळेतच देवाची सेवा प्रार्थना करु शकतो.
धीर धरण्याची आपली क्षमता नाही, म्हणूनच आपण माणूस म्हणून जन्माला आलोय,आपल्याला जो वेळ आणि कार्य सोपवून दिले आहे ते करताकरता सतत ईश्वराचा धावा करीत सत्कर्म करुन , दुसऱ्यांच्या
उपयोगी पडून आपले जीवन सार्थकी लावावे.
आताच्या युगात हेही नसे थोडके.
हे खूप विचार करुन अवतरले विचार आहेत.पटणार नाहीत पण खरे आहेत.
कारण आपल्याच घरातील एखादी व्यक्ती तासन्तास अशी ध्यानधारणा करीत बसली,किंवा आपण स्वतः जरी दहाबारा तास अशी तपश्चर्या करीत बसलो तरी उदरनिर्वाहाचा प्रश्न येतोच,
आणि तो प्रश्न जरी सुटला तरीमाणसाला ऐशोआरामाची जी
सवय झाली आहे त्यातून तो ही असा त्याग करु शकेल कां?
कारण खरी भक्ती म्हणजे त्यागाची परिसीमा आणि आता नव्वद टक्के लोकांत ती नाही.
आता माणसाला मोबाईल शिवाय एक दिवस काढता येत नाही, उपासतापास हे जमणार नाही,पायी चालत जाणे,जमणार
नाही,जमिनीवरबसणे,झोपणे,जेवणे,जमणार नाही,टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप वगैरे तांत्रिक उपकरणांशिवाय राहणे जमणार नाही,रोज साधे,सहज पचेल असे सुपाच्य भोजन जमणार नाही,साधे सुती अंगभरकपडे वापरणे जमणार नाही.रोज पहाटे उठून व्यायाम करणे, नैसर्गिक रितीने मिळणारा साधनांचा उपयोग करुन जगणे जमणार नाही,स्टेटस नावाची जी लाईफ स्टाईल आहे,त्यात जो मोठेपणा आहे,तो दाखविण्याचा जो आभास आहे तो, त्याशिवाय राहणे जमणार नाही,आपण मोठ्या हाॅटेलमध्ये मस्त पार्टी साठी जात असताना एखाद्या गरीब उपाशी भिकारी माणसाला आपल्या बरोबर नेऊन आपल्या
टेबलवर बसून जेवायला घालणे
जमणार नाही.
आपल्या घरातील कामे आपण स्वतःच करणे जमणार नाही,असो बरेच काही आहे तर
शेवटी आपण कुठे धडपणे काही करु शकत नाही,शेवटी पर्याय काय उरतो तर आपल्या जीवनशैलीतूनच वेळ काढून भगवंताचे नामस्मरण करीत जमेल तेवढी भक्ती, प्रार्थना करत रहावी,आणि मुख्य म्हणजे आपल्यातील एकमेकांवरील माणुसकी,आदराची भावना जप्त रहावी.मनमोकळ्या प्रेमळ भावनेने माणुसकी जपावी हेही नसे थोडके.
देव सर्वोच्च
शास्त्र, प्रार्थना हे सर्व महान आहे
मानवाने त्या शक्तींचा नित्य आदर करावा व सर्वांशी प्रेमाने, सलोख्याने वागावे,एवढीच देवाची इच्छा आहे,मग त्यांचीही काळजी मिटेल आणि आपलीही.
🙏🙏
स्वप्न गंधा सतीश आंबेतकर
मुंबई विरार.
🙏🙏
*संवाद मिडिया*
😊 *”मनासारख लोकेशन”….विश्वास अन् “स्वतःच्या घराचे समाधान” देणारा वास्तुप्रकल्प – ||ज्ञानेश्वरी||*🏬
*सविस्तर वाचा👇*
————————————————–
*बुकिंग सुर… बुकिंग सुरू…*📝
*मुंबई आणि चिपळूण मध्ये मिळालेल्या यशस्वी प्रतिसादानंतर 😇आता खास आपल्या गावी आपल्या माणसांच्या सेवेसाठी* 🏨
*मनासारख लोकेशन*….विश्वास अन् *स्वतःच्या घराचे समाधान* देणारा वास्तुप्रकल्प..
🏬 *D. D. S. Buildcon घेऊन आले..*🏬
🏨 _*||ज्ञानेश्वरी||*_🏨
*सुविधा :*
▪️बिल्डिंग नं. १ : दुकान गाळे + पार्किंग + ६ मजले
▪️बिल्डिंग नं. २ : पार्किंग + ७ मजले
▪️१ बीएचके, २ बीएचके, १ आरके फ्लॅटची सुविधा
▪️भूकंपरोधक बांधकाम
▪️पार्किंगमध्ये सौर ऊर्जांवर लाईट
▪️आकर्षक लॉबी
▪️लिफ्टची सोय
▪️ स्टील्ट पार्किंगमध्ये दोन रंगांमध्ये लादी
▪️पाण्याची 24 तास सोय
♦️ *उपक्रमाची वैशिष्ट्ये :*
▪️प्रत्येक इमारती समोर सीसीटीव्ही कॅमेरा
▪️अंतर्गत भुयारी गटारे
▪️वाहनतळ (स्टील्ट पार्किंग) सांडपाणी प्रक्रिया संयंत्र
👉 *१ आरके, १ बीएचके, २ बीएचके दुकानगाळे, ऑफिस उपलब्ध*🏬
🧾 *रेरा रजि नं. :* P52900048563
📧 *ई-मेल :* ddsbuildconpartner@gmail.com
🌐 *वेबसाईट :* www.ddsbuildcon.in
*प्रोप्रा. ज्ञानदेव सावंत*
📱 *संपर्क :* 9405671177 | 9405631177 | 8879181827
*पत्ता:* कुडाळ मार्केट व एसटी स्टँडच्या समोर चालत २ मिनिटाच्या अंतरावर तसेच रेल्वे स्थानकापासून १ किमी., ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग
————————————————–
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
——————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
——————————————————-
*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia
——————————————————-
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia
——————————————————-
*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad
——————————————————
*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia
——————————————————
📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻
https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ
—————————————————–
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*