धामापूर भावई मंदिर नजिक भरधाव ट्रकच्या धडकेत विद्युत पोलचे झाले तुकडे
भरधाव आणि अवैध वाहतूकीवर नियंत्रण कधी आणणार ? स्थानिकांचा पोलीस प्रशासनाला सवाल
मालवण
आज शनिवार दिनांक ३० सप्टेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या दरम्यान मालवण- धामापूर – कुडाळ या मार्गावर चौके येथून कुडाळच्या दिशेने चिरे वाहतूक करणारा ट्रक क्र. MH- 14 CP – 8787 या भरधाव ट्रकने धामापूर भावई मंदिर नजीक रस्त्याकडेला असलेल्या विद्युत पोलला जोरदार धडक दिली. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात घडला. या अपघातात विद्युत पोलचे अक्षरशः तुकडे तुकडे झाले आणि विद्युततारा तुटून रस्त्यावर पडल्या. आणि या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती . दरम्यान याच वेळी समोरून येणारा एक दुचाकीस्वार पडलेल्या वीज तारांमध्ये अडकून पडला आणि त्यालाही अपघात झाला. सुदैवाने त्याला गंभीर दुखापत झाली नाही. परंतु या अपघातात वीज वितरणचे मोठे नुकसान होऊन रस्त्याकडेला असलेल्या दगडी कुंपणाचे नुकसान झाले. तसेच परिसरातील वीजपुरवठा दिवसभर खंडीत झाला होता.
धामापूर ते नेरुरपार दरम्यान वारंवार अपघातास कारणीभूत ठरत असलेल्या अवैध वाळु आणि चिरे वाहतूक करणारे डंपर व भले मोठे ट्रक यांच्या भरधाव वेगावर आणि अवैध वाहतूकीवर पोलिस आणि महसूल प्रशासन कारवाई करून नियंत्रण कधी आणणार असा सवाल यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी केला.
संवाद मीडिया*
*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘
*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*
🥜 *आमची उत्पादने*🥜
*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*
🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒
*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*
*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*
*🌎 www.sunandaai.com*
*✉️ sunandaaikrushi@gmail.com*
*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*