*काव्य निनाद साहित्य मंच पुणे समूहाच्या सदस्या कवयित्री सौ कविता वालावलकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*परतुनी या वर्षाला*
गणेशाच्या उत्सवात
श्री गणेशाला निरोप
अजून हवे रे तुझ्या
सहवासाचे मज रोप
किती आनंद होता तो
बाप्पा घरी असताना
कंठ दाटून येतो तो
तुला निरोप देताना
दहा दिवस पाहूणा
आनंद घेऊन येतो
जाताना आम्हाला मात्र
उदास करुन जातो
परतुनी या वर्षाला
वाट पहात आहोत
मूर्ती मनातली तुझी
जणू भक्तिमय ज्योत
अनंत चतुर्दशीला
मन फार दु:खी होते
तुझी रिक्त ती रे जागा
डोळ्यात अश्रू दाटते
सौ कविता किरण वालावलकर
दावणगिरी कर्नाटक