You are currently viewing गणेश स्वरूप

गणेश स्वरूप

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*

 

*गणेश स्वरूप..*

 

गणेश हे प्रेरणा देणारी दैवत आहे त्याचबरोबर बुद्धीची देवता ही आहे.अबाल वृद्धांपासून सर्वांचे आवडते दैवत म्हणजे गणपती. हे दैवत कोपिष्ट नाही. तेजस्वी असले तरी तापहीन आहे. गणपतीचे केवळ नाव घेतले तरी एक मोहक रूप नजरेसमोर येते. आणि त्याच्याशी खुला संवादही होतो. आज या माध्यमातून मी गणपतीचे तत्त्व आणि स्वरूपा विषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे.

 

गणेशाच्या जन्माची कथा आपल्याला माहीतच आहे. पण गणेशाला गजमुखच का लावले गेले असावे हा प्रश्न पडणे साहजिकच आहे. यामागचे रूपकात्मक कारण असे असावे, हत्ती विशाल असतो, त्याची स्मरणशक्ती तल्लख आहे, हत्ती सदैव आत्मविश्वासाने शाही थाटात चालतो, त्याप्रमाणे ज्ञानी आणि योगी व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत डगमगत नाही.

 

हत्तीची सोंड मजबूत वृक्ष उमळून टाकते आणि सन्मान देण्याची वेळ आल्यावर सलाम करण्यासाठी वरही जाते. हत्तीच्या या सोंडेसारखी शक्ती सत्यज्ञान धारण करणाऱ्या माणसात असते. गणपतीचे सुपा सारखे कान हे एकाग्रतेचे प्रतीक मानले जातात. ज्ञानश्रवण. लक्षपूर्वक ऐकण्यासाठी गणपतीचे हे कान रूपकात्मक आहेत.

गणपतीचे डोळे हत्तींच्या डोळ्यांसारखे सारखे चित्रित करतात, कारण या डोळ्यांना छोट्या गोष्टी मोठ्या दिसतात. ज्ञानी व्यक्ती नेहमीच छोट्यांमध्येही मोठेपण पाहते. प्रत्येकातील महानता बघून त्याचा आदर करावा अशी शिकवण यातून मिळते.

गणपतीचा एक सुळा, दुष्ट लोकांना भीती दाखवण्यासाठी आहे. थोडक्यात गजमुख हे आत्मिक शक्तीचे प्रतीक मानले जाते.

 

गणपतीस लंबोदर असे आपण म्हणतो. समाजातील चांगले वाईट सामावून घेण्यासाठी मन, विचार व्यापक असावे लागते. ज्ञानी व्यक्ती निंदास्तुती, जय, पराजय, उच्च, नीच अशा अनेक प्रकारच्या परिस्थिती आपल्यात सामावून घेत असतात. म्हणजे मोठे पोट हे या गुणांचे प्रतीक असल्याचे मानले जाते. सर्वकाही पोटात सामावून घेण्याचा गुण.

 

गणपतीच्या चारभुजांपैकी एका हातात कुऱ्हाड असते. ज्ञानार्जनाने मोहाची बंधने तोडून टाकता येतात. कुऱ्हाड हे मुक्ततेचे प्रतिक आहे. हातातले कमळ ही आनंद स्थिती चे रुपक आहे.

 

गणपतीच्या हातातला मोदक परिपूर्ण स्थितीचे द्योतक आहे. ज्ञानाद्वारे प्राप्त होणाऱ्या अवस्थेचा यातून परिचय होतो.

 

विशाल काय गणपतीचे वाहन मात्र छोटा मूषक. ते का? प्रत्येक गोष्टी कृतडणाऱ्या मूषक हा चांगल्या वाईट प्रवृत्तींवर नियंत्रण ठेवण्यासाठीचे एक प्रकारचे रूपक आहे

 

गणपतीची बैठक ही एक पाय उचललेला दाखवते. याचा अर्थ गणपती हे असे दैवत आहे जे नेहमी भक्ताच्या रक्षणासाठी तत्पर व सिद्ध आहे तर असे आहे हे गणेश तत्व, गणेश स्वरूप! गणपतीला ब्रम्ह तत्वही मानण्यात येते. गणपती हाच ब्रह्म विष्णू महेश इंद्र सूर्य चंद्र आहे असे मानले जाते अशा या ओंकार स्वरूप गणेश तत्वास मी भक्ती व्हावे वंदन करते.

 

धन्यवाद!

 

राधिका भांडारकर

 

 

*संवाद मिडिया*

 

*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची – ओंकार ट्रेडर्स*

 

*लिंक वर क्लिक करा 👇*

————————————————–

*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची…*🙏🏻😇

 

*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव☝️ ठिकाण जिथे गणपतीसाठी लागणारे सर्वकाही मिळेल एका छताखाली 😇 तेही अगदी माफक दरात..*

 

🌐 https://sanwadmedia.com/105547

 

🎨 *ओंकार ट्रेडर्स*📿

 

👉 जिल्ह्यातील होलसेलर आणि रिटेलर शॉप

 

👉 गणपतीसाठी लागणारे सर्व प्रकारचे रंग 🎨, ज्वेलरी👑📿, ब्रश🖌️, कॉम्प्रेसर, क्ले टूल्स, इतरही सर्व साहित्य होलसेल दरात मिळतील.😇

 

👉 शाडू माती व प्लास्टर(POP) मिळेल.

 

🎴 *ओंकार ट्रेडर्स*

*माणगाव तिठा, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

 

*प्रो. प्रा. श्रीम. योगिता तामाणेकर*

 

☎️ *संपर्क :* ०२३६२ – २३६२६१

📱 *मो.९४२३३०४७९६,* *७७७४९००५०१,* *९४२१२६१०८९,* *९८३४३४३५४९*

 

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा