You are currently viewing 29 ते 30 सप्टेंबरपर्यंत यलो अलर्ट 

29 ते 30 सप्टेंबरपर्यंत यलो अलर्ट 

29 ते 30 सप्टेंबरपर्यंत यलो अलर्ट 

तर 1 ऑक्टोंबर रोजी ग्रीन अलर्ट

सिंधुदुर्गनगरी

मुंबई येथील प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या  माहितीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात दि.27,29 व 30 सप्टेंबर 2023 रोजी यलो अलर्ट (65 ते 115 मी.मी. पाऊस) दि. 28 सप्टेंबर रोजी ऑरेंज अलर्ट (115 ते 204 मी.मी.पाऊस) आणि दि. 1 ऑक्टोबर रोजी ग्रीन अलर्ट (65 मी.मी. पेक्षा कमी पाऊस) देण्यात आलेला आहे. तसेच दि. 27 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात गडगडाट होवून विजा चमकण्याची तसेच सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. या कालावधीत नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती  व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे.

या कालावधीत विजा चमकत असताना पुढीलप्रमाणे दक्षता घेण्यात यावी

1) विजा चमकत असताना संगणक, टीव्ही इत्यादी विद्युत उपकरणे बंद ठेवून स्त्रोतांपासून अलग करून ठेवावीत. 2) दूरध्वनी, भ्रमणध्वनी चा वापर टाळावा.3) विजा चमकत असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये. घराबाहेर असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा.5) विजेच्या खांबांपासून लांब रहावे. 5) विजा चमकत असताना उंच झाडाखाली आश्रयास थांबू नये.6) विजा चमकत असताना एखाद्या मोकळ्या परिसरात असल्यास, गुडघ्यामध्ये डोके घालून वाकून बसावे.7) धातूच्या वस्तू दूर ठेवाव्यात.8) वीज पडण्याची पूर्वसूचना मिळण्याकरिता आपल्या मोबाईल वर ‘दामिनी APP’ डाऊनलोड करून घ्यावे.

सततच्या पडणाऱ्या मुसळधार पावसात पुढीलप्रमाणे दक्षता घ्यावी

1) मुसळधार पावसात आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडणे टाळा. घराबाहेर अथवा असुरक्षित ठिकाणी असल्यास पाऊस थांबेपर्यंत सुरक्षित ठिकाणी आसरा घ्या.2) अतिमुसळधार व अतिवृष्टीच्या परिस्थितीत सुरक्षित ठिकाणी राहा व पायी अथवा वाहनाने प्रवास करू नका. 3) घराबाहेर पडणे अत्यावश्यक असल्यास निघण्यापूर्वी अधिकृत स्त्रोतांकडून हवामानाची, रेल्वेची व रस्ते वाहतुकीची व पाणी तुंबलेल्या ठिकाणांची माहिती करून घ्या.4) पाऊस पडत असताना विजा चमकत असल्यास झाडाखाली उभे राहू नये, मोबाईलवर संभाषण करू नये आणि इलेक्ट्रिक वस्तूंपासून दुर रहावे. अशा परिस्थितीत पक्के घर किंवा इमारतीत आसरा घ्यावा.5) मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या कुठल्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा जिल्हा नियंत्रण कक्ष 02362 228847 किंवा टोल फ्री 1077 संपर्क करावा. पोलीस नियंत्रण कक्ष 02362-228614, पोलीस टोल फ्री हेल्पलाईन -112. दोडामार्ग तालुका नियंत्रण कक्ष -02363-256518. सावंतवाडी तालुका नियंत्रण कक्ष -02363-272028. वेंगुर्ला तालुका नियंत्रण कक्ष -02366-262053. कुडाळ तालुका नियंत्रण कक्ष-02362 222525. मालवण तालुका नियंत्रण कक्ष -02365 252045. कणकवली तालुका नियंत्रण कक्ष -02367-232025. देवगड तालुका नियंत्रण कक्ष -02364-262204. वैभववाडी तालुका नियंत्रण कक्ष -02367 237239.या क्रमांकावर संपर्क साधावा.

 हवामानाची माहिती भारतीय हवामान खात्याच्या  https:/mausath.imd.gov.in/mumbai/modar distrust.pdf  या संकेतस्थळावरून घ्या.7) कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका. कुठल्याही मिळालेल्या बातमीची खात्री अधिकृत सूत्रांकडून करून घ्या किंवा जिल्हा नियंत्रण कक्ष (०२३६२) २२८८४७ किंवा टोल फ्री. १०७७ किवा पोलीस हेल्पलाईन क्रमांक ११२ वर संपर्क करा. 8) अतिवृष्टी कालावधीत झाडे पडणे, घर किंवा इमारत कोसळणे, पूर येणे, दरडी कोसळणे अशा आपत्ती घडण्याची शक्यता असते अशावेळी नागरिकांनी सतर्क रहावे.9) आपण पुरप्रवण किंवा दरड प्रवण भागात राहत असल्यास अतिवृष्टीच्या कालावधीत प्रशासनाकडून मिळणाऱ्या सूचनांचे पालन करा.10) पुरप्रवण क्षेत्र व पाणी तुंबण्याची ठिकाणे या ठिकाणी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्या बाबत जागरूक रहावे व योग्य ती दक्षता घ्यावी.11) जुन्या मोडकळीस आलेल्या इमारती, पूल इ. ठिकाणी जावू नये.12) अतिवृष्टी होत असताना कोणीही समुद्रात, नदी-नाले, धबधबे इ. ठिकाणी जावू नये.13) अतिवृष्टी कालावधीत रस्ते निसरडे बनल्याने अपघात  होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी वाहन चालवताना आवश्यक ती काळजी घेण्यात यावी.14) पुराच्या पाण्यात समुद्रात नागरिकांनी सेल्फी का नये, आपत्कालीन स्थितीत सेल्फी काढून नागरिकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालू नये.15) हामान विभागाकडून दिलेल्या इशाऱ्याच्या  पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपल्या जीवित व मालमत्तेची काळजी घ्यावी

*संवाद मीडिया*

*सावंतवाडी शहरातील उस्फुर्त प्रतिसादानंतर*

*_🤗आम्ही लवकरच बांद्यात येतोच…!!🥳_*

*🏢सावंतवाडीतील ग्राहकांच्या👥 उदंड प्रतिसादा 🤗 नंतर तीच चव आणि तोच दर्जा घेवून 👌🏻तुमच्या आवडीच*

*_🍽️”बेलिफ द किचन” 🍽️_*
*आता बांद्यात येतय…!!🛣️*

*🍱खवय्यांना पर्वणी ठरणारे अनेक पदार्थ..🤤*

*पिझ्झा🍕, बर्गर🍔, सँडविच 🥞, शोरमा🫔, मोमोज🍚 यासह स्पेशल बिर्याणी🍛 व तंदूर🥘*

*_🔖शुभारंभ २ ऑक्टोबर.._*

*आमचा पत्ता:-*👇

*🍽️”बेलिफ द किचन”🍽️*

*निवी निकी कॉम्प्लेक्स हॉटेल, कावेरीच्या समोर, मुंबई-गोवा महामार्ग*

*📲संपर्क:-*
*९१५८९८७६७८ / ९२७३८२५२३२*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/110721/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*
;

प्रतिक्रिया व्यक्त करा