You are currently viewing तोल जावून विहिरीत कोसळल्याने मळगाव येथे एकाचा मृत्यू…

तोल जावून विहिरीत कोसळल्याने मळगाव येथे एकाचा मृत्यू…

तोल जावून विहिरीत कोसळल्याने मळगाव येथे एकाचा मृत्यू…

सावंतवाडी

मळगाव कुभांरआळी येथील नागेश महादेव राऊळ (वय ६३) यांचा मृतदेह त्यांच्या घरासमोर असलेल्या विहिरीत आढळून आला आहे. ही घटना आज सकाळी घडली. पाणी काढत असताना तोल जावून विहिरीत पडल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याबाबत सावंतवाडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

श्री. नागेश हे नेहमी प्रमाणे सकाळी घरालगत असलेल्या विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेले होते. दरम्यान ते उशीरापर्यंत घरी परतले नाही. त्यामुळे त्यांच्या घरातील व्यक्तींनी त्यांची शोधाशोध केली असता विहिरीत तरंगत्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला. याबाबतची खबर त्यांचे नातेवाईक खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रमोद गावडे यांनी पोलिसांना दिली आहे. त्यानुसार पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा