You are currently viewing संविता आश्रमासाठी युवासिंधु फाऊंडेशनने केलेल्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद..

संविता आश्रमासाठी युवासिंधु फाऊंडेशनने केलेल्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद..

कुडाळ
तालुक्यातील संविता आश्रम अणाव येथे कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला होता, हे आपणा सर्वांना माहीत आहेच; पण त्यावेळी आश्रम मधिल सर्व कपडे जाळून टाकले. कारण कोरोना आटोक्यात आणण्यासाठी ते आवश्यक होते. पण अश्यावेळी एक नवीन प्रश्न निर्माण झाला होता कि, कपड्यांची कमतरता निर्माण झाली होती आणि थंडिचे दिवस चालु होणार अश्या परिस्थितीत युवासिंधु फाऊंडेशनच्या माध्यमातून आश्रमातील लोकांना जुन्या कपड्यांची त्यात पॅन्ट, लुंगी, शर्ट, साड्या ड्रेस आणि स्वेटर, चादर, बेडशीट अशा जुन्या कपड्यांसाठी एक आवाहन केले होते. त्या आवाहनाला सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि ते सर्व सामान आणि खाद्य संविता आश्रमला सर्वांच्या वतीने पोच करण्यात आले. त्या बद्दल सर्व दात्यांचे आमच्या युवासिंधु फाऊंडेशन परिवाराकडुन मनापासून आभार असेच सहकार्य आपणा सर्वांकडून मिळावे हिच प्रेमळ विनंती.

प्रतिक्रिया व्यक्त करा