You are currently viewing लोकमान्यांच्या नजरेतून गणेशोत्सव..

लोकमान्यांच्या नजरेतून गणेशोत्सव..

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ. सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*लोकमान्यांच्या नजरेतून गणेशोत्सव..*

 

स्वातंत्र्याच्या गळचेपीला मार्ग शोधण्या नवा

टिळकांना वाटले मार्ग हा नवा शोधाया हवा…

लेखन भाषण स्वतंत्र्यावर नजर करडी होती

कारावास नि पुस्तक बंदी, गाणी कुणी ना गाती…

 

दडपशाहीचा वरवंटा तो फिरत होता फार

वंदेमातरंम आणि तिरंगा यांना होता मार

लाठीमाराने ते जबरी करत होते घायाळ

गोची झाली होती नि जनतेची होती आबाळ ..

 

युक्ती सुचली टिळकांना नि बाहेर आला गणेश

कथा नाटके आणि भाषणे चढला की आवेश

स्वरूप आले खूपच मोठे गणेश जिकडे तिकडे

पुजा आरत्या सुरू जाहल्या ब्रिटिशांना साकडे…

 

धर्माला जर हात घातला काय होतसे पुढे

अवगत होते ब्रिटिशांना ते करू न शकले वाकडे

गप्प राहूनी गंमत बघती नजर ठेऊनी असती

लोक जमती समुहाने पण,काही न चाले युक्ती..

 

सार्वजनिक मग गणेश झाला उत्सव झाला सुरू

लोक लागले बोलू, मत व्यक्त लागले करू

आडपडद्याने लोक बोलती समाज जागृती होई

हात चोळती ब्रिटिश तेव्हा इलाज चालेना काही…

 

अर्थ लोपला आज पुरता झाला पहा बाजार

टिळक जर का आले आता, होतील पुरे बेजार

काय पेरले देवा मी रे काय फळ पण आले

सुज्ञ होती जनता येथिल वाहून असे का गेले ?

 

पश्चातापाच्या अश्रूंनी फिरवतील ते तोंड

फळे विषारी का ही आली पायावर पडली धोंड…

 

प्रा.सौ.सुमती पवार UK

(९७६३६०५६४२)

 

*संवाद मिडिया*

 

👩‍👩‍👧‍👦 *मुक्तांगण (Day Care Centre + Classes)*👩‍👩‍👧‍👦

 

*Advt Link👇*

————————————————–

📝 *प्रवेश सुरु!* *प्रवेश सुरु!*📝

 

👩‍👩‍👧‍👦 *मुक्तांगण ( Day Care Centre + Classes)*👩‍👩‍👧‍👦

 

👉 Ju Kg ते आठवी वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी जेवण 🍛व क्लासची एकत्रित सुविधा 📚👩🏻‍💻

 

(होमवर्क तसेच Grammer इत्यादीचा परिपूर्ण अभ्यासक्रम समाविष्ट)📑

 

👉 TV, Mobile यापासून दूर ठेऊन मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी अग्रेशीत

 

⏰ *वेळ: सकाळी 10 ते 5:30 पर्यंत*

 

👉 (मिलाग्रीस हायस्कूल मधील मुलांना पिकअप करण्याची सोय आहे)

 

*पत्ता:* बाबा फर्नांडिस F – 122, बांदेकर मेस समोर, मिलाग्रीस हायस्कूल नजिक, सालईवाडा, सावंतवाडी

 

📱 *संपर्क:*

सौ.सरोज राऊळ मो.नं: 8983757132

सौ.सुरेखा बोंद्रे मो. नं: 8975257453

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा