पर्यटन व्यावसायिक महासंघ अध्यक्ष श्री विष्णू मोंडकर यांची माहिती..
मालवण :
पर्यटन आणि हरित गुंतवणूक ही जागतिक पर्यटन वर्ष २०२३ ची जागतिक थीम असुन या थीम अनुसरून या वर्षीचा 27 सप्टेंबर 23 जागतिक पर्यटन दिन किल्ले सिंधुदुर्ग वर साजरा केला जाणार आहे. या मध्ये भारत पर्यटन विभाग नवी दिल्ली चे अधिकारी सौ. भावना शिंदे उपस्थित राहणार असून या कार्यक्रमासाठी प्रमुख अथिति म्हणून भारत पर्यटन विभागामार्फत सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी श्री किशोर तावडे यांना भारत पर्यटन विभागामार्फत संपर्क व पत्रव्यवहार केला गेला आहे. सदर कार्यक्रम भारत सरकार पर्यटन विभाग, पर्यटन व्यावसायिक महासंघ, तारकर्ली पर्यटन विकास संस्था तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्याने स्थापन झालेल्या युवा टुरिझम क्लब तसेच ग्राम पर्यटन समिती अध्यक्ष व समिती सदस्य यांच्या माध्यमातून साजरा केला जाणार आहे.
कार्यक्रमाची सुरवात सकाळी 9 वाजता स.का.पाटिल महाविद्यालय मालवण आयोजित श्री भुजंगजी बोबडे यांचे संग्रहालय, पुरातत्व, सास्कृंतिक विषयावर व्याख्यान आयोजित केले असून त्यानंतर सकाळी 11 वाजता किल्ले सिंधुदुर्ग वर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिरामध्ये प्रमुख अथीतींच्या वतीने उपस्थितांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची विधिवत पूजा तसेच उपस्थितांना तसेच नव्याने स्थापन झालेल्या शालेय विद्यार्थ्यांच्या युवा पर्यटन क्लब व अन्य उपस्थितिना सिंधुदुर्ग किल्ल्याबद्दल माहिती तसेच किल्ला परिसर क्लीन एण्ड ड्राइव मोहिम कार्यक्रम आयोजित केला आहे. तसेच मान्यवरांच्या हस्ते तारकर्ली पर्यटन संस्थेच्या टुरिझम वेब पोर्टल चा छत्रपती शिवाजी महाराज मंदिरामध्ये उद्घाटन समारंभ आयोजित केला आहे.
सिधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून शासकीय मान्यता असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन क्षेत्रात शाश्वत पर्यटन विकासासाठी पर्यटन विकासाठी पर्यटन व्यावसायिक महासंघ प्रयत्नशील असुन जिल्हयातील सागरी पर्यटना सोबत एग्रो, मेडिकल, जंगल सफारी, ऐतिहासिक, कातळशिल्प, साहसी क्रीडा, गड किल्ले, धार्मिक, वनराई, मँग्रोज, पक्षी निरीक्षण, फिशिंग टुरिझम क्षेत्रात स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायत निहाय पर्यटन प्रकारची वर्गवारी करून जिल्ह्यातील प्रत्येक गाव ग्रामपर्यटनाच्या माध्यमातून समृद्ध होण्यासाठी पर्यटन व्यावसायिक महासंघ प्रयत्नशील आहे. याचाच भाग म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 431 ग्रामपंचायत स्तरावर ग्रामपर्यटन विकास समिती गठीत होण्याची प्रोसेस पूर्ण होत आहे. या पर्यटन समिती च्या माध्यमातून भरीव निधीसाठी राज्य व केंद्र सरकारच्या अधिकारी वर्गाकडे पर्यटन व्यावसायिक महासंघ प्रयत्न करणार असून छत्रपती शिवाजी महाराजांचे एकमेव मंदिर असलेल्या किल्ले सिधुदुर्ग वर मंदिर नूतनीकरण तसेच किल्याची डागडुजी, एैतिहासिक विहीर नष्ट झालेल्या पुरातन वास्तू पुनर्जिवकरणाची माहिती भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या अधिकारी वर्गाला दिली जाणार असून आवश्यक निधीची मागणी पर्यटन व्यावसायिक महासंघ तर्फे केली जाणार आहे. तरी यासाठी जिल्ह्यातील पर्यटन ग्राम समिती पदाधिकारी, पर्यटन व्यावसायिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री विष्णू मोंडकर अध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघा तर्फे करण्यात येत आहे.