वाघाच्या मुक्त संचाराने ग्रामस्थ भयभीत
वनविभागाने बंदोबस्त करावा अशी ग्रामस्थांची मागणी
मालवण
चिंदर लब्देवाडी भगवंतगड माळावर वाघाच्या मुक्त संचाराने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. ग्रामस्थांच्या पाळीव जनावरांवर हल्ले केल्या नंतर दिवसा सुद्धा वाघ दर्शन देत असल्याने वनविभागाने तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थां मधून होत आहे. पाच दिवसा पूर्वी लब्देवाडी येथील समीर लब्दे यांच्या बकरी वर माळावर सोडलेल्या असताना या वाघाने हल्ला केला होता. तेरई येथील ग्रामस्थांच्या बकऱ्यांवर सुद्धा या वाघाने हल्ला केला आहे.
वाघाच्या दहशतीने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. वनविभागाने पिंजरा लावत या वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.