चक्कर येऊन पडल्याने परप्रांतीय मजुराचा मृत्यू ; दोडामार्ग बाजारपेठेतील घटना
दोडामार्ग
दोडामार्ग बाजारपेठेत फिरत असताना अचानक चक्कर येऊन पडल्याने तरुण कामगाराचा मृत्यू झाला. अनुज निकोडीम केरळकट्टा (३२, रा. झारखंड, सध्या रा. दोडामार्ग) असे त्याचे नाव आहे. दोडामार्ग पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलीसांकडून प्राप्त माहिती अशी की, मयत अनुज केरळकट्टा या तरुण डॉ.विश्वजित विष्णू सावंत यांच्याकडे मोलमजुरीच्या कामाला होता. गुरुवारी दुपारी दोडामार्ग बाजारपेठेत फिरत असताना चक्कर येऊन तो रस्त्यावर कोसळला. स्थानिकांनी त्याला तत्काळ दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकार्यांनी त्याला मृत घोषित केले. शवविच्छेदन अहवालानंतर त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट होईल. पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास दोडामार्ग पोलीस करीत आहेत.