आरोग्य विभाग भरतीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
सिंधुदुर्ग
आरोग्य विभागाकडून १०,९४९ पदांसाठी २९ ऑगस्टपासून नोंदणी सुरू झाली आहे. मात्र, दुर्गम भागांत तसेच अन्य काही ठिकाणी ऑनलाइन अर्ज भरण्यात अडचणी निर्माण होत आहेत. ही बाब लक्षात घेऊन १८ सप्टेंबरपर्यंत असलेली अर्ज सादर करण्याची मुदत आता २२ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.
आरोग्य विभागाकडून आरोग्य विभाग अंतर्गत गट ‘क’ व गट ‘ड’ संवर्गातील विविध पदांसाठी भरती
प्रक्रिया राबविली जात आहे. ऑनलाइन पद्धतीने ही अर्ज प्रक्रिया राबविली जात आहे. ऑनलाइन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी पण २२ सप्टेंबर रोजी र ११.५५ वाजेपर्यंत असणार आहे. यापूर्वी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. अर्ज सादर करण्यास दिलेली ही मुदतवाढ अंतिम असून यापुढे मुदतवाढ देण्यात येणार नाही, असेही आरोग्य विभागाच्या आयुक्तांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.