युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते तथा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार दोडामार्ग शहर शिवसेना शाखा सकाळी १०:३० वा., सावंतवाडी तालुका आमदार केसरकर कार्यालयात दुपारी १२:३९ वा., वेंगुर्ला शहर शिवसेना शाखा सायं. ४:३०वा युवासेनेच्या महत्वाच्या बैठका होणार आहेत. रविवार दिनांक २९ नोव्हेम्बर रोजी युवासेना राज्य कार्यकारिणी सदस्य रूपेश कदम तसेच युवासेना सिंधुदुर्ग जिल्हा विस्तारक अमितजी पेडणेकर यांच्या उपस्थितित होणार आहे.
तरी युवासेना उपतालुकाधिकारी, विभाग अधिकारी, उपविभाग अधिकारी शाखाधिकारी, उपशाखाअधिकारी आणि कार्यकर्ते यांनी वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन युवासेना जिल्हा अधिकारी श्मंदार शिरसाट तसेच युवासेना उपजिल्हाअधिकारी श्री सागर सोमकांत नाणोसकर यांनी केले आहे..