You are currently viewing ठिकरी

ठिकरी

  • Post category:कथा
  • Post comments:0 Comments

*मनमंथन साहित्य समूहाच्या सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री माया कारगिरवार लिखित अप्रतिम कथा*

*ठिकरी*

शहर म्हटलं की मोठ्या मोठ्या टोलेजंग इमारती ,चकचकीत रस्ते, हिरवेगार बगीचे ,लखलखणारे रस्त्यावरील दिवे ,रस्त्यावर धावणाऱ्या निरनिराळ्या रंगाच्या चार चाकी, दुचाकी गाड्या, माणसांनी तुडुंब भरलेले रस्ते, रेल्वेच्या लोकलचा विशिष्ट आवाज ,हे सगळं डोळ्यांनी बघत ,कानात साठवत चंपा आणि तिची मुलगी कमला एका इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी पोहोचल्या. भिरभिर बघू लागल्या .आतापर्यंत फक्त मुंबई शहराचं नाव ऐकलं होतं. पण आता कामाच्या निमित्ताने म्हणजेच पोटाची खळगी भरण्याकरता म्हणून त्या मध्य प्रदेशातून एका ठेकेदाराने मजूर म्हणून आणलेल्या माणसांच्या लोंढ्या सोबत मुंबईत आल्या होत्या .डोळे विस्फारुन त्या इकडे तिकडे बघत होत्या .एका टोलेजंग इमारतीच्या बांधकाम चालू असलेल्या त्या इमारतीच्या गेटमधून त्या आत आल्या .चौकीदाराने चौकशी करून पाणी प्यायला दिले .आणि जरा सावलीत बसायला जागा दिली. ठेकेदार बाकी मजुरांना घेऊन दुसऱ्.या इमारतीकडे गेला होता .दोघीही पहिल्यांदाच मोठे शहर आणि मोठ मोठ्या इमारती बघत होत्या .त्यामुळे जरा भेदरलेल्या होत्या.
संध्याकाळ होत आली होती .त्या इमारतीच्या बाजूलाच एक आलिशान इमारत होती. त्यात लोक राहायला पण आले होते ..त्या सोसायटीतच या इमारतीच्या बिल्डरचा फ्लॅट होता .तो त्याच्या कुटुंबासोबत त्या फ्लॅटमध्ये राहायचा .सोसायटीमध्ये दोन आऊट हाऊस होते. बिल्डरने चंपा आणि तिच्या मुलीला राहायला ते आऊट हाऊस दिले .आणि दुसऱ्या एका आऊट हाऊस मध्ये चौकीदाराची फॅमिली होती.
चंपा अंगाने धडधाकट होती .कामात प्रामाणिक होती. आणि स्वभावाने शांत होती पण कणखर होती . आपण गाव सोडून शहरात आलो याची पूर्ण जाणीव ठेवून ती कामावर राहू लागली .तिची मुलगी कमला जेमतेम बारा वर्षाची .शाळेत जात होती गावी असताना .सातवीपर्यंत शिक्षण झालं होतं तिचं .पण चंपाने मुलीला कधीच दगड विटांचे काम करायला नेलं नव्हतं म शाळा झाली की ती घरीच असायची.
दोघी मायलेकी आता चांगल्या सरावल्या होत्या शहरी वातावरणात.बिल्डर महेश आणि त्याची बायको चारू .त्यांना एक मुलगी होती .तिचं नाव पंकजा .उच्चभ्रू लोकांची सोसायटीत तसाही मुलांना खेळायला सोबत नसते. ते आपल्या घरातच टीव्हीवरचे गेम खेळत असतात .महेश कामासाठी सतत बाहेर ..चारू घरातली कामं आटोपले की टीव्ही बघत बसे…पंकजाला सुट्टीच्या दिवशी मात्र खूप बोअर .व्हायचं .तिलाही बाहेर जाऊन मुलींमध्ये मैदानामध्य खेळावंसं वाटायचं.एक दिवस ती खिडकीतून बाहेर बघत असताना तिला चंपाची मुलगी कमला आणि चौकीदाराची मुलगी(सुजाता) अंगणात काहीतरी खेळताना दिसतात. त्यांच्या खेळ बघून पंकजाला गंमत वाटली .त्या दोघी तिच्याच वयाच्या होत्या .पंकजाला खूप वाटा वाटायचं की आपणही त्यांच्यासोबत खेळावं पण घरात विचारायची हिंमत होत नव्हती.
गाडीतून शाळेत जाताना युनिफॉर्म मधील पंकजा बघून इकडे कमला आणि सुजाता यांनाही आपल्याला असं शाळेत जायला मिळाला तर असं वाटायचं .जे आपल्याजवळ नाही ते हवं ही माणसाची किती स्वाभाविक प्रवृत्ती आहे ना…!!
पंकजाला कमला आणि सुजाताशी मैत्री करावीशी वाटू लागली .ती शाळेत जाताना त्यांच्याकडे बघून एक स्माईल द्यायची .आणि त्यांना बाय करायची. एकदा गाडी थांबवून तिने त्या दोघींची ओळख करून घेतली.
” ए तुमचं नाव काय ग..?
“मी कमला आणि मी सुजाता” दोघींनाही खूप आनंद झाला .तुम्ही हे काय खेळताय ग…?
आम्ही ठिकरी खेळतोय कमला बोलली”….!
” ए मी येऊ काय तुमच्यासोबत “खेळायला”….
ये की …! कमला बोलली ….त्या दोघींनाही खूप आनंद झाला…सुट्टीच्या दिवशी पंकजा त्यांच्यासोबत खेळायला येऊ लागली. त्यांच्यासोबत छान मैत्री झाली होती…
दिवसा मागून दिवस जात होते त्या तिघेही भराभर मोठ्या झाल्या .पंकजा सुख वस्तु कुटुंबातली त्यामुळे ती वयात आल्यावर सुंदर दिसू लागली. सुखवस्तू घरातले तेज तिच्या तारुण्यावर पखरण करत होते .पण कमलाचं तारुण्यही बहरास आलं होतं .ती मुळातच नाकीडोळी, रंग कांतीने सुंदरच होती, ती गरीब घरची पणतिचं तारुण्य मात्र श्रीमंतीलाही लाजवणार होतं. कमला तर कमलदलासारखी सुंदर कोमल, मोहक , लाघवी रूप घेऊन बहरात आली होती. आता पंकजा आणि कमला यांची घट्ट मैत्री झाली होती. चंपाबाईच्या प्रामाणिकपणामुळे अधून मधून पंकजाची आई चारू चंपाबाईला आपल्या घरातील काम करायला बोलावू लागली .त्यामुळे पंकजा आणि कमला या एकमेकींच्या घरी जाऊ लागल्या .पंकजा शाळेतून आल्यावर कमलाला आपली पुस्तके वाचण्यास देत असे ..पावसाचा पहिला थेंबाचा आनंद जसा चातक पक्षाला होतो तसाच आनंद पुस्तके मिळाली की कमलाला होत असे”….
कमला आईला म्हणाली माॅं मुझे भी पढना है !मुझे पढ लिखकर बडा होना है..!
चंपाबाई ह़$$श !एक सुस्कारा टाकून मंद स्मित करायची कमलाकडे बघून आणि बोलायची..
” हा बेटा तुम्हे पढाने का तो मेरा भी सपना है ! अभी नये नये हम मुंबई मे आये है! कुछ पैसे जादा मिल जाये तो तुझे मै जरूर पढाऊंगी…..
शेवटी चंपा एक आई होती ती झोपडीतली असो की बंगल्यातली असो मुलीच्या डोळ्यातले स्वप्न आईलाच कळते …ती महत्त्वाकांक्षी होती ..रात्रंदिवस मेहनत करीत होती…
पंकजा जवळ एक दिवस कमला शिकण्याची इच्छा व्यक्त करते ..पंकजा ने तिच्या ओळखीच्या शिक्षिकेला कमलाच्या घरी येऊन शिकवण्याची विनंती केली. अशा रीतीने कमलाच्या शिक्षणाला सुरुवात झाली. पंकजा सुखव वस्तू कुटुंबातली असली तरी स्वभावाने निर्मळ ,शांत, सालस होती .तिचा कमलावर खूप जीव होता. त्यांची मैत्री दिवसेंदिवस फुलू लागली …त्यांच्या मैत्रीत कधीच गरीब श्रीमंती हा विषय आला नाही..
ही सोसायटी समुद्रा पासून काही अंतरावरच होती ..त्यामुळे रात्री समुद्राच्या लाटांचा आवाज तिथे राहणाऱ्यांना सहज ऐकू यायचा..पंकजा तिच्या फ्लॅट च्या खिडकीतून समुद्राच्या उसळणाऱ्या लाटांचा आणि त्या विशाल समुद्राचा आनंद घेत असे …सागर लाटांची गाज ऐकत असे…कमला मनाने रसिक होती ती कविताही करत असे..सागर किनाऱ्यावरच्या त्या इमारती तिचं मन मोहन टाकत होत्या ..ती कित्येकदा पंकजा सोबत किनाऱ्यावर रुपेरी वाळूत खेळायला जात असे .दोघीही संध्याकाळी सागरकिनाऱ्यावर भटकत असायच्या ..अगदी अंगावर लाटांना घेऊन खूप हसत खेळत एन्जॉय करायच्या…दोघींचे दिवस छान मजेत चालले होते .तारुण्य सुलभ इच्छा आकांक्षा त्यांच्याही मनात निर्माण व्हायच्या..

एक दिवस कमला आंघोळ झाल्यावर ओल्या केसांनी अंगणातल्या दोरीवर कपडे वाळत घालत होती. तिच्या काळ्याभोर केसातून पाण्याचे थेंब गळत होते ..तिने तो केशसंभार खांद्यावरून पुढे घेतला होता त्यामुळे खांद्यावरील पदराचा तो भाग ओला झाला होता आणि तिची यौवनकांती बघणाऱ्याच्या नजरेत सहज भरत होती …तिच्या ओल्या अस्तित्वाचा गंध तिथे दरवळला होता …इतक्यात सोसायटीच्या गेटमधून एक मर्सिडीज गाडी आत आली .राजीवचे कमलाकडे लक्ष गेले …त्याने गाडीची काच खाली केली ..आणि अनिमिष नेत्राने तो कमलाकडे बघू लागला ..या सोसायटीत एकोणिसाव्या माळ्यावर त्याचा फ्लॅट होता .तो एका श्रीमंत बापाचा मुलगा होता .दिसायला राजीव राजबिंडा होता .श्रीमंतीचं तेज त्या च्या मुखावर होतच ..तो कॉलेजमध्ये एमबीए करत होता ..थोडी गाडी पुढे घेऊन त्याने कमलाच्या अंगणासमोरून गाडी पुढे पार्किंग मध्ये लावली ..जाताना त्याने कमलाकडे एक कटाक्ष टाकून स्मित हास्य केले …कमला लगेच घरात गेली आणि तिने दरवाजा बंद करून घेतला….
राजीव घरी गेला पण कमलाचं सौंदर्य काही त्याच्या डोळ्यापुढून जाईना…एका नजरेत तो तिच्यावर मोहित झाला होता …दुसऱ्या दिवशी राजीव शीळ घालत लिफ्टमधून बाहेर आला ..हातातली गाडीची चावी हवेत भीरकावीत गाडी कडे जात होता ..पुन्हा त्याचं लक्ष अंगणात उभे असलेल्या कमलाकडे गेले …त्याने स्मित हास्य केलं आणि भरकन गाडीतून निघून गेला …पण मनात कमलाच्या सौंदर्याचा भुंगा घिरट्या घालत होता….
एक दिवस त्याने कमला आणि पंकजाला समुद्राकडे जाताना बघितलं होतं …त्याची आणि पंकजाची चांगली ओळख होती ..त्याने पंकजामार्फत कमलाशी मैत्री करायचं ठरवलं ..त्याने पंकजाला आणि कमलाला येताना पाहिलं दोघीही लाटांशी खिळून आल्या होत्या ..परत ते कमलाचं ओलं सौंदर्य राजीव नेत्रांना चैन पडू देत नव्हते..त्याने पंकजाला थांबवून कमलाशी ओळख करून घेतली. कमला ओशाळल्यागत झाली होती..राजीव गेल्यानंतर पंकजाने त्याची ओळख करून दिली …ती बोलली हा राजीव चांगला मुलगा आहे ….श्रीमंत बापाचा आहे …सध्या एमबीए करतोय…पण तो स्वभावाने चांगला आहे ..
त्यांच्या ओळखीचे रूपांतर काही दिवसांनी मैत्रीमध्ये झालं ..बरेचदा पंकजा कमला आणि राजीव कधी कधी आऊटिंगला जात असत …त्याच्या मोकळ्या स्वभावामुळे तो कमलाला देखील आवडू लागला होता ..पण कमलाला आपल्या परिस्थितीची जाणीव होती..त्यामुळे ती केवळ मैत्रीपूर्तीच पंकजा सोबत असतानाच राजीवशी बोलायची….
पंकजा सोबत सोबत कमलाची खाजगी शिकवणी लावून शिक्षण चालू होतं ..दोघेही ग्रॅज्युएट झाल्या पुढे दोघी एमए झाल्या ..आणि पंकजा लेक्चरर म्हणून कॉलेजमध्ये नोकरी करू लागली ..आणि कमला शाळेतील मुलांच्या ट्युशन घेऊन घरी आईला आर्थिक मदत करू लागली .
आता कमलाची आर्थिक परिस्थिती जरा स्थिरस्थावर होऊ लागली तशी तिच्या राहणीमानातही फरक पडू लागला त्..यामुळे ती आणखी सुंदर दिसू लागली …कमलाच्या सौंदर्याने आणि स्वभावाने राजीवच्या मनावर गारुड केले असते ..तो या मैत्रीमध्ये गरीब श्रीमंत हा भेदभाव विसरून गेला.
कमलावर राजीवचं जीवापाड प्रेम असते ..कमलाही त्याच्या प्रेमाचा स्वीकार करते ..पण कमला आईला सांगते तेव्हा चंपाबाई तिला म्हणते…,कमला ये बहुत बडे लोग है हमारा और उनका कोई मेल नही होगा !…इससे अच्छा है कि तू भूल जा..चंपाबाईला राजीवचा स्वभाव माहित असतो. तो चांगला मुलगा आहे हे ही तिला माहीत असते..पण गरीब श्रीमंतीची दरी असते …त्याबद्दल चंपाबाई पूर्ण सावध असते …आईचं म्हणणं कमलाला पटतं पण राजीव चा विचार ती एकाकी मनातून काढू शकत नाही..
पंकजा चे वडील महेश बिल्डर क्षेत्रातले असतात त्यामुळे त्यांच्याकडे या क्षेत्रातल्या बऱ्याच मंडळीची येजा सुरू असते ..त्यात संजय नावाचा बिल्डर महेश कडे नेहमी यायचा ..एक दिवसत्याची नजर कमलावर पडते..संजयच्या नजरेत लालसा निर्माण होते…..
तो मनातच म्हणतो ,”पाखरू छान आहे की …”! उडवावा लागेल एक दिवस ..
!आणि गालातल्या गालात छद्मी हसतो.. …!
कमलाच्या यौवनकांती ची भुरळ संजयच्या मनावर दिवसेंदिवस गडद होत जाते …त्याच्या या सोसायटीमध्ये महेश कडे चकरा वाढू लागतात…त्याच्या वासनांध नजरेचीभणक कमलाला जाणवते ..ती पंकजाला सावध करते……
कमलाचे दुर्दैव दबा धरून बसले असते ..आणि एक दिवस आक्रीत च घडते ..पंकजाचे आई-वडील बाहेरगावी गेले असतात .त्या दिवशी पंकजा घरात एकटीच असल्याने ती कमलाला रात्री सोबत म्हणून तिच्याकडे बोलवते….दोघीही मैत्रिणी गप्पा टप्पा करत हसत खेळत संगीताचा आनंद घेत घरात मजा करत असतात …दोघीही गाणी ऐकता ऐकता बेडवर झोपायला जातात .तेव्हा रात्रीचा एक वाजला असतो आणि दारावरचीबेल वाजते…
पंकजा म्हणते ,” कमला कोण आलं असेल गं एवढ्या रात्री …? परत दोन-तीनदा बेल वाजते …पंकजा दार उघडते…..!
पंकजा बोलते ,”अरे संजय काका तुम्ही एवढ्या रात्री”….
” संजय बोलतो ,…मला एक फाईल हवी आहे ,तुझ्या बाबांशी बोलणं झालंय ,ती फाईल दे …मी निघतो…..पंकजा फाईल आणायला आत जाते …”तेवढ्यात कमला बाहेर येते”
” कोण आहे ग पंकजा असं विचारते”…
कमलावर नजर जाताच संजय मधील शैतान जागा होतो.त्याची वासनांध नजर चाळू लागते..त्याला हीच संधी योग्य वाटून तो आत येतो…आणि बाहेरील दरवाजा बंदकरतो…
एवढ्यात पंकजा फाईल घेऊन बाहेर येते ..ती आल्याबरोबर संजय तिच्या तोंडावर हात दाबून तिला दुसऱ्या खोलीत घेऊन जातो आणि कोंडून ठेवतो ..आणि खोलीचे दार बाहेरून बंद करतो…….
आता त्याच्या तावडीमध्ये कमला चांगलीच सापडते …तो उपाशी वाघासारखा कमलावर झेप घेतो..कमला त्याच्या तावडीतून सुटण्याचा खूप प्रयत्न करते ..जीवाच्या आकांताने ओरडते..पण संजय बेमालुमपणे त्याची वासना तृप्त करतो आणि निघून जातो …कमला निपचीत ,अर्धवट शुद्धी मध्ये खाली जमिनीवर पडलेली असते …तिच्या शरीरातील गात्रगात्र थकलेले असतात …संजय जाताना पंकजाच्या खोलीच्या दाराची कडी काढून जातो … कमलाच्या विव्हळण्याच्या आवाजाने पंकजा बाहेर येते …कमलाचीअवस्था बघून हंबरडा फोडते…तिला हृदयाशी कवटाळून ती खूप रडते…कमलाला पाणी पाजते ..आणि तिला उचलून बेडवर ठेवते आणि पप्पांना फोन करते…
पंकजाचे आई-वडील गावावरून येतात..पंकजा सगळी आपबिती पप्पांना सांगते ..संजय ला बलात्काराच्या आरोपांमध्ये अटक केली जाते.. …
पण कमलाच्या भविष्याचा काय….?चंपा उद्ध्वस्त होते …हाताशी आलेली इतकी सुंदर पोर त्या नराधमाना नासवली असते …कमलाची मानसिक अवस्था तर खूप केविलवाणी असते .ती आतून होलमडते उध्वस्त होते तिची जगण्याची इच्छाच मरून जाते ..रडून रडून डोळ्यांच्या खोबण्या झाल्या असतात..
पंकजा ची आई चारूला देखील या घटनेने खूप धक्का बसतो..कारण त्यांच्या घरातच हे सगळं घडलं असते…त्यातल्या त्यात पंकजा त्या नराधमापासून वाचली असते .याचे त्यांना समाधान असते…पण गरीब चंपाच्या मुलीबद्दल कमला बद्दल मात्र त्या खूप अगतिक होतात….खूप दुःखी होतात ….
राजीवला या घटनेची माहिती मिळते ..त्याला खूप धक्का बसतो. राजीव कमलाला भेटायला येतो..कमलाच्या भावनांचा बांध फुटतो राजीव जवळ..ती राजीवला मिठी मारते ..आणि ढसढसा रडते ..राजीव तिची समजूत काढतो …राजीव खूप प्रेम करतो कमलावर…
” राजीव बोलतो ,…कमला तू स्वतःला सावर…मी अजूनही तुझ्यावर प्रेम करतो …तुझ्याशी लग्न करायला तयार आहे… ”
पंकजा च्या घरी हॉलमध्ये महेश, त्याची बायको चारू ,चंपाबाई, कमला”, राजीव सगळे हजर असतात. पण सगळ्यांची मनस्थिती अतिशय विदीर्ण झाली असते….
थोडसं स्वतःला सावरून कमला बोलते …”राजीव मी आजपर्यंत ठिकरी खेळणारी होते..चौकोनातली ठिकरी बाहेर कशी काढायची हे मला चांगलंच अवगत होतं …पण आज मी स्वतःच त्या चौकोनातील ठिकरी झाले आहे…..आता जो येईल तो मला असाच पाय मारून चौकोनाच्या बाहेर काढेल त्…यामुळे मी लग्न केलं काय आणि न केलं काय….?
मी कोणाशी लग्न केले तरी माझी जागा चौकोनातल्या ठिकरी चीच राहील …त्यामुळे तू मला विसरून सुखी हो…राजीव…असं म्हणून कमला आईच्या कुशीत स्वतःला झोकून देते..आणि ढसढसा रडते ..डोळ्यात भविष्याचा अंधार घेऊन. …. ल

सौ. माया कारगिरवार .

*संवाद मीडिया*

*प्रवेश देणे चालू आहे !!*

१० वी १२ वी(सायन्स, आर्ट ,कॉमर्स) किंवा ग्रॅज्युएशन नंतर वैद्यकीय क्षेत्रातील शॉर्ट टर्म कोर्स करा आणि शासकीय निमशासकीय हॉस्पिटल व डायग्नोस्टिक सेंटर येथे घडवा आपलं करिअर!

*आरोग्य क्षेत्रात नौकरीची सुवर्ण संधी!!!!!*

*शिकविण्यात येणारे कोर्सेस :-*
💀 *रेडिओलॉजी डिप्लोमा कोर्सेस :-*
१. एक्सरे टेक्निशियन
2.सी टी स्कॅन
३.एम.आर.आय. टेक्निशियन
४. डी एक्स आय टी
🧪 *पॅथोलॉजी डिप्लोमा कोर्सेस :-*💉
१.एम.एल.टी
२.डी. एम. एल. टी
३. ऍडव्हान्स डी. एम. एल. टी*

*इतर कोर्सेस :-*
१.ओ.टी टेकनॉलजी.
२. डिप्लोमा इन ओ टी.
३.डायलेसिस टेकनॉलजी
४. डिप्लोमा इन डायलेसिस टेक्नॉलॉजी
५. डिप्लोमा इन इ. सी जी टेक्नॉलॉजी
६. डिप्लोमा इन इ. इ. जी. & इ.एम. जी. टेक्नॉलॉजी
७. नर्सिंग केअर

● *फी मधे आकर्षक सूट*
● *अनुभवी प्रशिक्षक*
● *प्रात्यक्षिकसाठी दवाखान्यात प्रक्षिशण उपलब्धता*

*पत्ता* :-
*उत्कर्ष अकॅडमी ऑफ ग्लोबल करीअर*
*पहिला मजला,देवरुख एस.टी.स्टॅण्ड, देवरुख*रत्नागिरी-४१५८०४*
*मोबाईल- 8369106430/8291348515*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108237/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा