You are currently viewing ऋषिपंचमी महात्म्य

ऋषिपंचमी महात्म्य

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ.राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*

*ऋषिपंचमी महात्म्य*

भाद्रपद शुक्ल पंचमी ही वैदिक स्मार्ट परंपरेत ऋषिपंचमी म्हणून ओळखले जाते. व्यास हे वैदिक धर्माचे अनुयायी आणि वेदांचे संहिताकार म्हणून ओळखले जातात.

ऋषिपंचमीच्या दिवशी व्यास आणि त्यांचे शिष्य सुमती, जैमिनी, वैशंपायन इत्यादी आणि सूत्र व भाष्यकारांचे स्मरण करून उदक सोडून त्यांचे तर्पण करतात. ही ऋषीपंचमी साजरी करण्यामागची मूळ संकल्पना आहे. गुरूंचे, गुरु शिष्यांचे स्मरण आणि त्यांना आदरांजली अर्पण करण्याचा हा दिवस.

भारतात सप्तर्षींना फार महत्त्व आहे. वशिष्ठ, कश्यप, अत्री, जमदग्नी, गौतम आणि विश्वामित्र हे ते सात महान ऋषी. यांची ऋषीपंचमीच्या दिवशी पूजा केली जाते. एका अर्थाने असेही म्हणता येईल की व्यासपौर्णिमा, जैन संवत्सरी व ऋषीपंचमी ही सर्व व्रते गुरुपरंपरेचे स्मरण आणि गुरुस्थानी आदरयुक्त भावना व्यक्त करणारी आहेत.

मुळातच भारतीय संस्कृतीमध्ये गुरुजनांचा, मातापित्यांचा, बुजुर्गांचा, अनंतात विलीन झालेल्या कुटुंबीयांचा आदर राखणे, त्यांचे स्मरण करणे, त्यांच्या अनुभवांचे शिदोरी बाळगून जीवन सुसह्य आणि सफल करणे या सर्व बाबींना खूप महत्त्व आहे आणि ऋषिपंचमी सारखे सण साजरे करण्यामागे मुळात या हेतूंना महत्त्व आहे.

कुठल्याही संकल्पनांना धार्मिक बैठकीमुळे श्रद्धेचा भाव साकारतो आणि डोळसपणे तसेच जाणीवपूर्वक अशी व्रत्ते करणाऱ्या व्यक्ती भरकटलेल्या समाजाला नक्कीच पुन्हा दिशा दाखवू शकतात.

प्रत्येक व्रता मागे कहाण्या असतात, दंतकथा असतात. ऋषिपंचमीच्या व्रता संबंधातही अशी कहाणी आहेच. सुमती नावाच्या पुत्राने पशु योनीतल्या आपल्या मातापित्यांना हे व्रत अंगीकारून कसे मुक्त केले याची कथा या व्रतामागे सांगितली जाते. कथेच्या अनुषंगाने या वृत्ताद्वारे एक प्रकारे बुजुर्गां विषयीचे प्रेम, आदर आणि सेवाभावच व्यक्त केला जातो. हे या व्रताचे खरे महात्म्य आहे.

या व्रताचे अनुसरण करताना आणखी एक शिकवण सहज दिलेली आहे. या दिवशी बैलाच्या कष्टाचे उगवलेले अन्नधान्य, वनस्पती न खाता मनुष्य कष्टाने पिकवलेल्या धान्य, भाज्यांचा भोजनात समावेश केला जातो. यात जशी प्राण्यांविषयी करुणा आहे तसेच स्वकष्टाचे ही महात्म्य, आवश्यकता व्यक्त केलेली आहे. माणूस आणि मातीचं अतूट नातं मनावर बिंबवलेलं आहे. निसर्गा विषयीचा कृतज्ञता भाव प्रकट केलेला आहे पर्यावरण पूरक संकल्पनाही यात जपलेली आहे.

बाकी व्रत कोणतंही असो त्याच्या पालनाने जीवनात सुख, शांती, समृद्धी, आरोग्य, इच्छापूर्ती, स्वप्नपूर्ती होते हे मध्यवर्ती लाभ मनात ठेवून जरी सामान्य बुद्धीने या व्रतांचे पालन केले तरीसुद्धा त्यामुळे सूक्ष्मपणे मानवी जीवनात होणारे बदल हे निश्चितच महत्त्वपूर्ण ठरू शकतात. ऋषिपंचमीच्या व्रतपालना मागेही पौराणिक परंपरेचा हाच उदात्त हेतु आहे.

राधिका भांडारकर पुणे

*संवाद मिडिया*

*सुवर्ण संधी!सुवर्ण संधी!!फिजियोथेरेपी डॉक्टर होण्याची सुवर्ण संधी!!!*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)* करण्याची सुवर्णसंधी.

Affiliated to MUHS,Nashik,DMER व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त कॉलेज मध्ये

*प्रवेश सुरु -शैक्षणिक वर्ष 2023-2024*

*श्री रामराजे कॉलेज ऑफ फिजियोथेरेपी , दापोली.*

*COLLEGE CODE-6191*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)*
Eligibility- 12th Science (PCB)With NEET and Must Registered with CET Cell can apply.

• Duration : 4.5 Years

*👉मागासवर्गीय विद्यार्थांना शिष्यवृत्ती.(शासन नियमानुसार).*

*पत्ता:*
प्रांत ऑफिस जवळ,दापोली, ता. दापोली, जिल्हा रत्नागिरी, 415712

*संपर्क:*
📲 9145623747/ 9420156771/7887561247*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/107166/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा