कुडाळ
तालुक्यातील वयोवृद्ध लाभार्थी आहेत. अशा लाभार्थ्यांना उत्पन्न दाखल्याची अट शिथिल करून वयोवृद्धांना विशेष सवलत देऊन त्यांचे प्रस्ताव गाव तलाठी मार्फत समिती सभेमध्ये यावेत अशा सूचना दिल्या. झालेल्या समिती सभेमध्ये अध्यक्ष अतुल बंगे यांनी देऊन सभेमंध्ये ४६ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली. कुडाळ तालुका संजय गांधी निराधार समितीची सभा समिती अध्यक्ष अतुल बंगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
यावेळी सचिव तहसीलदार अमोल फाटक, अतिरिक्त गटविकास अधिकारी भोई, सदस्य श्रेया परब, बाळा कोरगावकर, प्रवीण भोगटे, महेश सावंत, दिलीप सर्वेकर, संजय पालव, महादेव पालव हे उपस्थित होते. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या शिफारीसी नुसार वरील प्रस्तावांना मंजुरी देताना वयोवृद्धांच्या विचार करताना काही खास सवलती देऊन समिती समोर आलेल्या लाभार्थ्यांची निवड करण्यात आली.
दिव्यांग प्रकरणे आत्माराम पाटकर (बिबवणे ), केतन कुपेरकर (आवळेगाव),साधना तेली (आंब्रड), अनुज घाडी (नेरूर त.हवेली), धीरज घाडी (नेरूर त.हवेली), वासुदेव शेदुलकर(कसाल), विकास कांदळकर(कसाल), उज्वला सावंत (आंबडपाल), अर्जुन गावडे (मडगाव), विठ्ठल डुबळे (निवजे), रेणुका परब (कूपवडे), सीताराम पेडणेकर(कुंदे), शीतल परब (आंब्रड), योगेश जाधव(पांग्रड) विधवा राष्ट्रीय योजना श्रद्धा सातार्डेकर (पिंगुळी), संजीवनी शेरीगर (कुडाळ MIDC ), सुनंदा दाभोलकर(ओरोस), बाया सावंत (कुपवडे) निराधार विधवा व मुले वैभवी पेडणेकर (मांडकुली), समश्वेता गावडे (माङयाचीवाडी ), शुभदा सावंत (आकेरी), विद्या तेंडोलकर(तेंडोली) श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना(गट अ ) प्रकाश साळगावकर(साळगाव), विनायक अणावकर (अणाव), आनंदी कासार (गोठोस), विठ्ठल परब (अणाव), लक्ष्मण खेडेकर (आंब्रड), सुंदरा गोसावी (अणाव), अनुसया परब (अणाव), सावित्री केसरकर (अणाव), प्रतिभा परब (अणाव) श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना(गट ब ) वामन घाडी (सोनवडे त.कळ.), राघोजी परब (हिर्लोक),सुभद्रा सुर्वे (काडावल), यदुनाथ वायंगणकर (पावशी), सखाराम परब (माणगाव), पुंडलिक आचरेकर (आंब्रड),रंजना तेंडोलकर(तेंडोली), वामन सावंत (कुपवडे), महादेव कोचरेकर (पाट ), लक्ष्मी परब (अणाव), प्रतिभा आचरेकर (आंब्रड) ही सर्व प्रकरणे समिती सभेमध्ये मंजूर करण्यात आली. यावेळी समिती सचिव तथा तहसीलदार अमोल फाटक यांनी उपस्थितांचे आभार मानले.