*मराठी साहित्य मंडळाच्या पूर्व विदर्भ अध्यक्ष पदावर श्री नरेन्द्र मोहिते यांची नियुक्ती*
विदर्भात मराठी साहित्य मंडळाच्या कार्याचा विस्तार व्हावा, मंडळाचे संघटन वाढावे व यासाठी विदर्भ प्रदेश अध्यक्षांसोबत अमरावती व नागपूर या दोन विभागातील योग्य व्यक्तीची विभागीय अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्याचा विचार बऱ्याच दिवसापासून मंडळाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या मनात होता. यासाठी बुधवार दि. १३ सप्टेंबर २०२३ रोजी ठाणे येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाच्या मुख्य कार्यालयात नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या विशेष सभेत संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉ जयप्रकाश घुमटकर यांच्या आदेशानुसार श्री नरेन्द्र मधुसूदन मोहिते यांची पूर्व विदर्भ अध्यक्ष म्हणजेच नागपूर विभागिय अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली.
*येत्या शनिवार दि. ३० सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता नारायणा विद्यालयम, सोमलवाडा नागपूर येथे मा केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते मराठी साहित्य मंडळाच्या मराठी साहित्य संमेलनाचे उदघाटन होत आहे. या निमित्ताने विदर्भातील अनेक क्षेत्रातील अनुभवी, सक्रिय व अभ्यासू व्यक्तिमत्व व मराठी साहित्य मंडळ, नागपूर जिल्ह्याचे कार्याध्यक्ष श्री नरेन्द्र मोहिते यांचेकडे पूर्व विदर्भाच्या नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया व भंडारा या सहा जिल्ह्याच्या विभागीय अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्याचे सर्वानुमते ठरले. त्यानुसार श्री नरेन्द्र मधुसूदन मोहिते यांची मराठी साहित्य मंडळाच्या नागपूर विभागीय अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात येत आहे.*
श्री नरेन्द्र मोहिते हे नागपूर विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य असून महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री दर्जा असलेल्या किमान वेतन सल्लागार मंडळाचे अध्यक्ष राहिले आहेत. यावेळी त्यांनी कित्येक कोटी कामगारांच्या किमान वेतनात लक्षनिय वाढ करवून कामगार क्षेत्रात अतुलनीय कार्य केले होते.
नरेन्द्र मोहिते हे सध्या अखिल भारतीय मराठा महासंघाचे नागपूर विभागिय अध्यक्ष असून मराठा समाजासाठी सतत कार्यशील असतात. यांचा विविध क्षेत्रातील दांडगा संपर्क, कार्यक्षमता, स्पष्ट वक्तेपणा, निस्वार्थ व प्रामाणिक कार्य करण्याची वृत्ती आणि झोकून देऊन काम करणे इ. अनेक गोष्टी लक्षात घेऊन मराठी साहित्य मंडळाचे विदर्भ अध्यक्ष मा. श्री सिद्धार्थजी कुळकर्णी यांच्या शिफारशीनुसार राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉ जयप्रकाश घुमटकर यांनी मराठी साहित्य मंडळाचे कार्य वाढवण्याच्या संपूर्ण जबाबदारीसह श्री नरेन्द्र मोहिते यांची पूर्व विदर्भ अध्यक्ष म्हणजेच नागपूर विभागिय अध्यक्ष पदावर नियुक्ती केली आहे. या निवडीबद्दल साहित्य विश्र्वामधून त्यांच्यावर अभिनंदनांचा वर्षाव होत आहे.
त्यामध्ये संमेलनाध्यक्ष डॉ. रेखा जगणाळे मोतेवार, जिल्हाध्यक्ष डॉ बळवंत भोयर, डॉ रवींद्र शोभणे, राजू वाघ, प्रवीण उपलेंचवार, दिपकराव देशमुख, अनिलजी मालोकर, डॉ विशाखा कांबळे, डॉ रमनिक लेनगुरे, सौ. निता चिकारे, डॉ. हिरालाल मेश्राम, डॉ. मनीष उपाध्ये, उमरेड येथून डॉ. बळीराम राऊत, प्रा. बळीराम भांगे, प्रा. पूनम भुरे, जिजा मेहेरे मानकर, सौ आरती वाघमारे, श्रीमती अनिता मसराम, सौ. मडावी मॅडम, नांदेड येथून डॉ घनश्याम पांचाळ, डॉ संगीता घुगे, वर्धा येथून लता हेडावू, अंजली कांबळे, चंद्रपूर येथून प्रा. भारती चोपडे, यवतमाळ येथून डॉ दिलीप अलोने, नाशिक येथून नीलिमा जोशी, कोल्हापूर येथून रेखा दिक्षित, कराड येथून विनायकराव जाधव, ठाणे येथून ललिता गवांदे आदी मान्यवरांचा समावेश आहे.
आज मनोहरराव कामडी महाविद्यालय येथे श्री नरेन्द्र मोहिते यांचे अभिनंदन करण्यात आले.
धन्यवाद..
*प्राचार्य डॉ. हिरालाल मेश्राम*
नागपूर शहर सचिव
*संवाद मीडिया*
🚇🚆🚆रेल्वेकडून विशेष सहलीची योजना, इन्डियन रेलवे केटरिंग व टूरिज़म कडून ‘ *उत्तर भारत देवभूमी यात्रा* भारत गौरव स्पेशल पर्यटन रेल्वे’ लोकांच्यासाठी स्वस्तात सहलीचे आयोजन 🚊🚉
चला मग, भारत गौरव ट्रेनने *हरिद्वार, ऋषिकेश, अमृतसर आणि माता वैष्णोदेवीचे दर्शन आणि मथुरा* फिरुया.
स्लीपर SL व 3AC, 2AC क्लास – ज्यामध्ये रेल्वे व बस प्रवास, भोजन व राहण्याचा खर्च शामिल आहे
निर्गमन- दि. 28/10/23 ते 05/11/23 (08 रात्र आणि 09 दिवस)
प्रवास खर्च फक्त:-
Package Category
1) Economy (SL)
₹ 15,300/-
2) Comfort (3AC)
₹ 27,200/-
3) Deluxe (2AC)
₹ 32,900/-
ज्यामध्ये भेटीची ठिकाणे-
28/10/23 – पुणेहुन प्रवास सुरुवात
29/10/23 – हरिद्वार येथे आगमन. हॉटेल चेक इन (हरिद्वार येथे रात्री मुक्काम). 30/10/23 – सकाळी न्याहारी नंतर ऋषिकेशचे स्थानिक प्रेक्षणीय स्थळ आणि हर की पौरी येथे गंगा आरती. नंतर अमृतसरकडे प्रस्थान. (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
31/10/23 – अमृतसरला आगमन आणि सुवर्ण मंदिर, बाघा बॉर्डरला भेट. नंतर कटरा साठी प्रस्थान. (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
01/11/23- कटरा येथे आगमन. सकाळी 10.30 वाजता हॉटेल चेक इन करून आणि माता वैष्णोदेवी दर्शनासाठी पूर्ण दिवस (कटरा येथे रात्री मुक्काम).
02/11/23 – संध्याकाळी मथुरा साठी प्रस्थान. (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
03/11/23 – मथुरा येथे आगमन, फ्रेश होऊन नंतर वृंदावन आणि कृष्णजन्म-भूमीला भेट देणे संध्याकाळी उशिरा परतीचा प्रवास सुरू (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
04/11/23 – ट्रेन प्रवास
05/11/23 गोड आठवणीने प्रवास समाप्त पुणे
बोर्डिंग आणि डी-बोर्डिंग पॉईंट्स: पुणे-लोणावळा-कर्जत-कल्याण-वसई रोड-वापी-सुरत-वडोदरा
समाविष्टितसेवा व् सुविधा-
1) Economy Category – Sleeper class Train Journey, Basic Onboard & Offboard Meals, Stay in Non AC Hotels on TWIN/ TRIPLE, Wash n Change on Multi Share in Non AC Hotel Room (Maximum 5 PAX in One Room), Non AC Transport
2) Comfort Category 3AC Train Journey, Basic Onboard & Offboard Meals, Stay in AC Budget Hotels on TWIN/ TRIPLE, Wash n Change on TWIN/ TRIPLE, in AC Hotel Room, AC Transport
3) Deluxe Category –2AC Train Journey, Basic Onboard & Offboard Meals, Stay in AC Budget Hotels on TWIN/ TRIPLE, Wash n Change on TWIN/ TRIPLE, in AC Hotel Room, AC Transport
*अधिक माहिती व बुकिंग करिता संपर्क* – *संजना टूर्स अँड ट्रॅव्हल्स* 🚘🚎✈️🚆
☎️ *7350 7350 91/7350 534 534*
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/107588/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*