You are currently viewing सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये पालक दिन उत्साहात साजरा

सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये पालक दिन उत्साहात साजरा

*सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये पालक दिन उत्साहात साजरा*.

वेंगुर्ला

सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल, वेंगुर्ला या प्रशालेत *पालक दिन* उत्साहात साजरा करण्यात आला. पालक दिनाच्या कार्यक्रमात दरवर्षी प्रशालेच्या पालकांमधून दोन पालकांना या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले जाते यावर्षी पालक ईशा मोंडकर,परशुराम वारंग उपस्थित होते. तसेच यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष इर्शाद शेख,संचालक प्रशांत नेरूरकर,प्रशालेच्या मुख्याध्यापिका मनिषा डिसोजा प्रशालेचे पालक शिक्षक संघाचे सदस्य,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी इयत्ता दहावीच्या नवीन कार्यकारी मंडळाचे स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने आपल्या पदाची ओळख करुन दिली. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष इर्शाद शेख, संचालक प्रशांत नेरूरकर यांचे स्वागत प्रशालेच्या मुख्याध्यापिका मनिषा डिसोजा यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे स्वागत इर्शाद शेख यांच्या हस्ते करण्यात आले.संस्थेचे उपाध्यक्ष इर्शाद शेख,मुख्याध्यापिका मनिषा डिसोजा, इशा मोंडकर, परशुराम वारंग यांनी पालकांना पालक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. पालक दिनाच्या महत्वाच्या प्रसंगी शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी स्वतः च्या हाताने बनविलेले ग्रिटींग कार्ड पालकांना देऊन पालक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.या ग्रिटींग कार्डवर विद्यार्थ्यांना आपल्या पालकांबद्दल काय वाटते याचे कृतज्ञता व्यक्त करणारे सुंदर संदेश लिहलेले होते. ग्रिटींग कार्ड वरील पालकांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणारे संदेश वाचून पालकांचे डोळे अश्रूंनी भरून येत होते.
या मोलाच्या प्रसंगी प्रशालेला वेळोवेळी मदत करणाऱ्या पालकांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फुलझाडांचे रोप देऊन आभार व्यक्त करण्यात आला. तसेच पालक संघ सदस्य आणि जेष्ठ नागरिक यांचा देखील गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी पालकांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले होते,नृत्य,समुहनृत्य, गीत गायन,स्वरचित काव्य वाचन या विविध कलाप्रकारातून पालकांनी आपले सादरीकरण केले. यामध्ये 68 वर्षाच्या आजीने केलेले कोळी नृत्य हे डोळ्यांचे पारणे फेडणारे होते. अशाप्रकारे पालकांनी उस्फुर्त प्रतिसाद या कार्यक्रमासाठी दाखविला. यावेळी पालकांच्या मनोरंजनासाठी विविध खेळांचे देखील आयोजन करण्यात आले. पालकांना आपल्या कलागुणांचे दर्शन घडविण्याचा आगळा वेगळा कार्यक्रम सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये दरवर्षी पालक दिनाच्या कार्यक्रमानिमित्त घेतला जातो.
या कार्यक्रमानिमित्त पालकांसाठी अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेच्या शिक्षिका प्रियंका मिसाळ व आभार प्रदर्शन शिक्षिका धनश्री नाईक यांनी केले.

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा