मालवण / मसुरे :
शालेय उपक्रमाअंतर्गत मसुरे येथील उपक्रमशील अशा केंद्र शाळा मसुरे नं. १ च्या इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांनी मसुरे येथील युवा मूर्तिकार अजित म्हाडगुत यांच्या गणेश मूर्ती शाळेला भेट देऊन शालेय क्षेत्रीय भेटीचा अनुभव घेतला.
क्षेत्रभेट हा एक शालेय जीवनातील कार्यक्रम आहे, यालाच शालेय सहल किंवा शैक्षणिक सहल देखील म्हणतात. क्षेत्रभेट म्हणजे एखाद्या क्षेत्राला भेट देणे होय. उदाहरणार्थ आपण सहलीला विविध ठिकाणी प्रवास करणे आणि नवनवीन ठिकाणांना भेट देणे हा आपल्या जीवनातीलच एक भाग आहे. कोणत्याही प्रवासातील सर्वात महत्वाचं घटक म्हणजे क्षेत्रभेट.
क्षेत्रभेट म्हणजे एका व्यक्तीने अथवा व्यक्तींच्या समूहाने, ठराविक क्षेत्राला भेट देऊन, त्या क्षेत्राचा आढावा घेणे होय. शैक्षणिक क्षेत्रात क्षेत्रभेट म्हणजे वर्गा बाहेरील कोणत्याही ठराविक क्षेत्राला भेट देणे होय.
क्षेत्रभेट म्हणजे शाळेद्वारे आयोजित करण्यात आलेली सहल ज्यात शाळेद्वारे विद्यार्थ्यांना घेऊन क्षेत्रभेट केली जाते. ज्याचा एकच मुख्य उद्देश असतो, तो म्हणजे भारतीय संस्कृतीचा परिचय, संस्कृतीचे महत्व, निसर्गाचा शोध, नवनवीन जीवनशैली आणि भाषेचे आकर्षण, विद्यार्थाना पटवून देणे.अशा या उपक्रमाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी मसुरे येथील श्री अजित म्हाडगुत यांच्या गणेश मूर्ती शाळेत मसुरे केंद्र शाळेच्या चिमुकल्या मुलानी भेट दिली या भेटीदरम्यान इयत्ता पहिलीच्या निधी दीपक पेडणेकर, देवेश साटम, गौरांग दुखंडेे तसेच दुसरीच्या समर्थ शिंगरे, रमेश मुळये, अलिया शेख या विद्यार्थ्यानी विविध प्रश्न विचारून, मूर्तिकला आणि मूर्तिकार यांच्या विषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. चिमुकल्या या मुलांच्या हरहुन्नरी प्रश्नांनी युवामूर्तिकार अजित म्हाडगुत अचंबित झाले.
आपल्या जीवनातील अनुभव सांगताना मूर्तिकार अजित म्हाडगुत म्हणाले पुर्वीची मूर्तीकला, व आताची मूर्तीकला यात खूप मोठा फरक झाला आहे. मूर्तीकरांच्या व्यथा, नवनवीन होत चाललेले बदल प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवरील उठवलेली बंदी त्यामुळे खरा मूर्तिकार, कलाकार कलेपासून दूर जात आहे. पर्यावरण पूरक मूर्तीची पूजा व्हायला हवी.ग्रामीण आणि शहरी भागातील खऱ्या मूर्तीकरांची मूर्ती कला टिकवून राहिली पाहिजे असे विचार व्यक्त केले. केंद्रशाळा मसुरे नं.१ च्या इ. पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकातील *क्षेत्रभेट* या विषयाचा प्रत्यक्ष स्थळाला भेट देऊन विद्यार्थ्यांनी आगळावेगळा अनुभव घेतला. या उपक्रमाचे प्रमुख मुख्याध्यापक सौ शर्वरी सावंत ,गोपाळ गावडे, विनोद सातार्डेकर ,रामेश्वरी मगर,प्रसाद कदम यांनी सहकार्य केले. या उपक्रमाचे केंद्रप्रमुख श्री.नारायण देशमुख शा.व्य.अध्यक्षा सौ.शितल मसुरकर, उपाध्यक्ष श्री संतोष दुखंडे, श्री.सन्मेश मसुरेकर, माजी सरपंच सौ,लक्ष्मी पेडणेकर या सर्वानी भरभरुन कौतुक केले.