सिंधुदुर्ग :
महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची बैठक सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑक्टोबर किंव्हा नोव्हेंबरमध्ये घ्यावी अशी मागणी मानवता विकास परिषदेचे अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडे केली आहे. आता पर्यंत सर्वच राजकीय पक्षांनी कोकणचा बॅकलॉग पूर्ण करण्यासाठी, घोषित करण्यात आलेल्या योजना पूर्ण करण्यासाठी निधीची तरतूद केली नाही. अनेक योजना कागदावरतीच राहिल्या आहेत. यासाठी सर्वच राजकीय पक्षांची अनास्था कारणीभूत आहे.
आता हीच वेळ आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू 4 डिसेंम्बर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत. आम्ही त्यांचे सिंधुदुर्ग वासीयां तर्फे स्वागत करीत आहोत. येण्यापूर्वी सिंधुदुर्ग वासीयांच्या विकासाच्या योजनांचा शुभारंभ करावा आणि सिंधुदुर्गवासी यांचा राहिलेला विकास आपल्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करावा तसेच मंत्रिमंडळाची बैठक सिंधुदुर्ग मध्ये झाल्यास सिंधुदुर्ग वाशी यांना विकासाची नांदी खुली होणार आहे यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र येऊन सिंधुदुर्गचा विकास करण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी श्रीकांत सावंत अध्यक्ष मानवता विकास परिषदेच्या वतीने केली आहे.